आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह करणाऱ्या महिलेचा पेन्शनवर हक्क, 'कॅट'चा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह करणाऱ्या महिलेचा पहिल्या पतीच्या फॅमिली पेन्शनवरही अधिकार असतो, असा निर्णय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) दिला आहे. संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी पवनकुमार गुप्ता यांच्या पत्नी रेणू गुप्ता (४७) यांना फॅमिली पेन्शनचा लाभ देताना कॅटने हा निर्णय दिला. 


कॅटचे सदस्य प्रवीण महाजन म्हणाले की, रेणू यांनी दुसरा विवाह करताना काहीही विचार न करता फॅमिली पेन्शन मुलाच्या नावावर ट्रान्सफर केली. मुलगा २५ वर्षांचा होताच ती पेन्शन संपुष्टात येते. मात्र महिलेचा दुसरा विवाह झाल्यानंतरही तिला पेन्शनचा लाभ दिला जाऊ शकतो असे सरकारने स्पष्ट केले अाहे. संरक्षण मंत्रालयाने ४ महिन्यांच्या आत फॅमिली पेन्शन मुलाच्या नावावरून रेणू गुप्तांच्या नावावर करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पतीच्या निधनानंतर संरक्षण मंत्रालयाने रेणू यांना १९९८ मध्ये स्टोअर किपर पदावर नियुक्त केले होते. त्यांना फॅमिली पेन्शनही दिली जात होती. 

बातम्या आणखी आहेत...