Tv / जेनीफर विंगेटनंतर आता सुनील ग्रोव्हरही ‘नच बलिए 9’मधून बाहेर

मोना सिंह करू शकते ‘नच बलिए 9’ शोचे सूत्रसंचालन

दिव्य मराठी

Jun 29,2019 11:56:00 AM IST

विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. असे ऐकण्यात आले होते की, सुनील डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए ९’द्वारे टीव्हीवर पुनरागमन करेल. काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी त्याला शोच्या सूत्रसंचालनासाठी ऑफरही दिली होती. सुरुवातीला त्याने यामध्ये आपला रसही दाखवला होता. मात्र, सूत्रांच्या मते, सुनीलने या शोचे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला आहे. निर्मातेही यासाठी कलावंतांचा शोध घेत आहेत.


कपिलच्या शोद्वारेही होती शक्यता
सुनीलच्या पुनरागमनाबाबत बोलायचे झाल्यास ‘द कपिल शर्मा शो’मधून तो पुनरागमन करू शकतो, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. तथापि, सुनील सर्व मुद्दे खोडून काढत म्हणाला, “सध्या कपिल शर्मासोबत कोणत्याही प्रकारचे काम करण्याचा माझा विचार नाही. मी योग्य वेळी प्रत्येक गोष्टीचा त्याग केला आहे.’


मोना सिंह करू शकते होस्ट
सुनीलच्या जागी मोना सिंह या शोचे सूत्रसंचालन करू शकते. मोनाने याबाबत आपली पसंतीही कळवली आहे. निर्मातेदेखील तिच्या निवडीचा विचार करत आहेत. म्हणजेच आधी जेनीफर विंगेट बाहेर पडली आणि आता अब सुनील ग्रोव्हर. दोघांची जागा मनीष पॉल आणि मोना सिंह घेऊ शकतात.


हीदेखील चर्चा आहे की, या शोसाठी दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहिया यांचादेखील विचार निर्मात्यांकडून केला जात आहे.

X