आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनमध्‍ये किकि चॅलेंज करणा-या 3 मुलांना शिक्षा; 3 दिवस स्‍टेशनची साफसफाई करायची आणि सर्वांना सांगायचे की, असे करणे धोकादायक आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धोकादाय‍क किकि चॅजेंज आता कारपासून ट्रेनपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत धावत्‍या ट्रेनमधून उतरून किकि डान्‍स करणा-या 3 मुलांना यामुळे एक चांगलाच धडा मिळाला आहे. त्‍यांना याप्रकरणी वसई कोर्टाने शिक्षा सुनावली असून, त्‍यामध्‍ये या मुलांना 3 दिवस रेल्‍वे स्‍टेशन परिसरात साफसफाई करायची आहे. तसेच यादरम्‍यान ज्‍या व्‍यक्‍तींची भेट होईल, त्‍यांना सांगायचे आहे की, किकि चॅलेंज करणे धोकादायक आहे. गुरूवारपासून त्‍यांच्‍या शिक्षेच्‍या अंमलबजावणीस सुरूवातही झाली आहे.


15 लाख लोकांनी पाहिला या मुलांचा व्हिडिओ
निशांत, ध्रुव आणि श्‍याम आणि काही दिवसांपूर्वी विरारच्‍या लोकल ट्रेनमध्‍ये किकि चॅलेंज केले होते. यादरम्‍यान ही मुल धावत्‍या ट्रेनमधून खाली उतरली होती व प्‍लॅटफॉर्मवर डान्‍स करून परत ट्रेनमध्‍ये चढली होती. या मुलांनी आपला हा व्हिडिओ सोशल मिडियावरही शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत 15 लाख लोकांहून अधिक जणांनी पाहिले आहे. या 15 लाख लोकांमध्‍ये मुंबई पोलिसांचाही समावेश होता.


कोर्टाने सुनावली अनोखी शिक्षा
पोलिसांनी व्हिडिओ आणि स्‍टेशनवरील सीसीटीव्‍ही फुटेजच्‍या आधारावर मुलांना अटक केली व रेल्‍वे कोर्टासमोर त्‍यांना सादर केले. कोर्टात येताच तिन्‍ही मुलांना रडू कोसळले. कोर्ट त्‍यांना म्‍हणाले की, 'तुम्‍ही तिघेही युवा आहात. मात्र तुमच्‍या हातून चूक झाली आहे. अशापद्धतीने स्‍टंट करणे धोकादायक आहे. आता तुम्‍ही शिक्षा म्‍हणून लोकांमध्‍ये याबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचे काम करावे. 3 दिवस स्‍टेशनची साफसफाई करावी व यादरम्‍यान लोकांना सांगावे की, जे आम्‍ही केले ते धोकादायक होते. यामुळे आम्‍ही आमचा व इतरांचा जीवही धोक्‍यात घातला.


रोज 4 तास करावी लागणार सफाई
या मुलांना सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत साफसफाई करायची आहे. नंतर एका तासाचा ब्रेक व  पुन्‍हा 3 ते 5 स्‍वच्‍छतेचे काम करायचे आहे. त्‍यांना 13 ऑगस्‍ट रोजी पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार असून तेव्‍हा शिक्षेच्‍या 3 दिवसांदरम्‍यान आपण जागरूकतेसाठी काय केले, हे या मुलांना कोर्टाला सांगावे लागणार आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...