Home | International | Other Country | after killing 3 children and spike their bodies on spike this evil roaming free again

45 वर्षे तुरुंगात राहून जामीनावर सुटला हा नराधम, गुन्हा असा की याला जिवंत पाहूनच नागरिकांचा उडतो थरकाप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 03:11 PM IST

नराधमाने हात-पाय कापून त्यांचे मृतदेह घराबाहेर रेलिंगला लटकवले होते.

 • after killing 3 children and spike their bodies on spike this evil roaming free again

  लंडन - ब्रिटनच्या वॉरसेस्टरशायर प्रांतातील वॉरसेस्टर शहरात 3 चिमुकल्या भाऊ बहिणींची कत्तल करणारा नराधम मोकाट फिरत आहे. कोर्टाने नुकतेच त्याला पॅरोलवर सोडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. येथील स्थानिकांसह मीडियाने सुद्धा त्याला पुन्हा तुरुंगात डांबण्यासाठी मोहिम राबवली आहे. डेव्हिड मॅकग्रेवी (67) याने अवघ्या 9 महिन्यांच्या मुलीला इतकी मारहाण केली की तिचा जीव गेला. यानंतर तिचा 4 वर्षांच्या भावाचा गळा दाबून आणि 2 महिन्यांच्या बहिणीचा गळा चिरून हत्या केली. एवढेच नव्हे, तर इतक्या लहान मुला-मुलींच्या मृतदेहांचीही विटंबना केली. त्या सर्वांचे हात-पाय कापून त्यांचे मृतदेह घराबाहेर असलेल्या रेलिंगवर लटकवले होते. अशा नराधमाची सुटका होऊच कशी शकते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


  काय आहे प्रकरण?
  > 1973 मध्ये एलसी नावाची एक महिला आपल्या दोन मुली आणि एका चिमुकल्या मुलासोबत वॉरसेस्टर शहरात राहत होती. पॉल (4), डॉन (2) आणि सॅमन्था (9 महिने) अशी तिच्या बाळांची नावे होती. कामावर गेल्यानंतर मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिने त्यावेळी 22 वर्षांचा युवक डेव्हिडला नोकरीवर ठेवले होते. मुलांचा सांभाळ करण्यासाठी ठेवणारा तिच्या चिमुकल्यांचा इतका पाशवी अत्याचार करेल याची एलसीने कल्पनाही केली नसेल.
  > ब्रिटिश दैनिक द सनच्या वृत्तानुसार, 13 एप्रिल 1973 रोजी डेव्हिडने एका मुलीला बेदम मारहाण करून जीव घेतला. मुलाचा गळा दाबून ठार मारले. तर दुसऱ्या त्यांची दोन वर्षांची बहिण डॉनचा गळा चिरला. ठार मारून त्याने सर्वांचे हात-पाय कापले आणि विक्षिप्त मृतदेह घराच्या रेलिंगला टांगले. पोलिसांनी अटक केली तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या अमानवीय कृत्याची कबुली दिली. सोबतच, हत्या करण्याचे कारणच नव्हते असेही मान्य केले.


  45 वर्षे अडवला पॅरोल...
  > त्याच वर्षी जूनमध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच किमान 20 वर्षे पॅरोल मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. 1993 मध्ये तो पॅरोलसाठी पात्र ठरला होता. परंतु, त्याच्या गुन्ह्याची तीव्रता आणि पीडित आईसह स्थानिकांच्या याचिकांवर सुनावणी घेताना कोर्टाने त्याला आयुष्यभर पॅरोल देणार नाही असे सांगितले होते.
  > 2006 मध्ये कोर्ट त्याला पॅरोल देत असल्याचे वृत्त समोर आले. यावर संतप्त नागरिकांनी पुन्हा कोर्टात याचिका दाखल केल्या आणि त्याची सुटका कुठल्याही परिस्थितीत करू नये अशी मागणी केली. मानसशास्त्र तज्ञांनी सुद्धा त्याची सुटका केल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे माथेफिरु हत्याकांड करू शकतो अशी भीती व्यक्त केली होती. 2009 आणि 2013 मध्ये सुद्धा त्याने केलेले प्रयत्न फोल ठरले.
  > यानंतर 2016 मध्ये त्याने कोर्टात पॅरोलसाठी नव्याने याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी घेताना न्यायाधीशांनी आणखी 2 वर्षांनंतर पॅरोल मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. 6 नोव्हेंबर 2018 रोजी दोन वर्षे पूर्ण झाल्याचे पाहता त्याने पुन्हा पॅरोलसाठी अर्ज केला. आता कोर्टाने आणि पॅरोल समितीने त्याचा अर्ज मान्य केला. आता हा नराधम त्याच कॉलनीतील एका घरात राहत आहे.


  तो आमच्याही चिमुकल्यांना ठार मारेल, मोकाट सोडू नका...
  डेव्हिडने तीन भाऊ-बहिणींचे मृतदेह रेलिंगला लटकवले तो दृश्य घरासमोरच राहणारे मायकल जोन्स यांनी पाहिला होता. सध्या 75 वर्षांचे असलेले मायकल म्हणाले, "त्या घटनेला 45 वर्षे उलटली. पण, आजही ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येते. इतकी निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला कोर्टाने मोकाट सोडलेच कसे. तो नराधम आमच्या कॉलनीत फिरतोय. त्याचा चेहरा पाहून मला ती निष्पाप मुलं आठवतात. त्यांच्या आईला कित्येक दिवसांपासून मी बोललेलो नाही. तरीही तिच्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आम्हाला वाटते की त्या नराधमाची जागा खुल्या समाजात मुळीच नाही." मीडिया आणि स्थानिकांनी पुन्हा त्या नराधमाला तुरुंगात पाठवण्यासाठी मोहिम छेडली आहे.

Trending