Home | International | Other Country | After landing gear in Myanmar, the pilot rounded the air to reduce fuel load; After successful landing done with the help of rear wheels

म्यानमारमध्ये लँडिंग गिअर झाले फेल, वैमानिकाने इंधनाचा भार कमी करण्यासाठी हवेत फेऱ्या मारल्या; नंतर मागील चाकांच्या मदतीने विमानाचे केले यशस्वी लँडिंग

दिव्य मराठी | Update - May 13, 2019, 10:28 AM IST

लँडिंगनंतर सरकारकडून प्रशंसा; प्रवासी म्हणाले, वैमानिक हाच आमचा हीरो

 • After landing gear in Myanmar, the pilot rounded the air to reduce fuel load; After successful landing done with the help of rear wheels

  यांगून - म्यानमारच्या सरकारी एअरलाइन्सच्या विमानाच्या वैमानिकाने सतर्कता दाखवत अपघात टाळला. चालक दलाच्या ७ सदस्यांसह ८९ प्रवाशांसह उड्डाण क्रमांक यूबी-१०३ ने रविवारी यांगूनहून उड्डाण केल्यावर मंडाले विमानतळावर पोहोचले. मात्र लँडिंग गिअर काम करत नाही, त्यामुळे पुढील चाक उघडत नाही, असे वैमानिक कॅप्टन मियत मोई अंगूच्या लक्षात आले. लँडिंग गिअर खाली आला की नाही हे वाहतूक नियंत्रकाला तपासता यावे म्हणून त्याने दोनदा लँडिंगचा प्रयत्न केला. दरम्यान, कॅप्टनने संगणक यंत्रणा, नंतर मॅन्युअलीही गिअर उघडण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. अखेर त्याने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. भीषण स्फोट होऊ नये म्हणून लँडिंगच्या आधी इंधन कमी करण्यासाठी हवेत फेऱ्या मारल्या. इंधन कमी होताच कॅप्टनने मागील चाकांच्या मदतीने विमानाचे लँडिंग केले, ते यशस्वी ठरले. लँडिंगमध्ये विमानाचा पुढील भाग घासला गेला, पण सर्व ८९ लोक वाचले.

  रनवेवर उतरताच विमानातून निघाल्या ठिणग्या

  काही प्रवाशांनी घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. एका व्हिडिओत विमान मागील चाकांवर लँड करताना दिसते. यादरम्यान विमानाचा पुढचा भाग काही अंतर घासला. घासल्यामुळे त्यातून ठिणग्या आणि धूरही निघाला. मात्र, घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब आणि आपत्कालीन कर्मचारी असल्याने आग लागली नाही. विमान थांबल्यानंतर चालक दलाने प्रवाशांना खाली उतरवले. विमान अॅम्ब्रेयर-१९० एलआर आहे, त्यात ११४ लोक बसू शकतात.


  घटनेनंतर विमानतळ अडीच तास बंद
  > म्यानमार वाहतूक मंत्रालयाचे सचिव विन खांत यांनी यशस्वी लँडिंगबद्दल वैमानिकाचे कौतुक केले. सुरक्षित लँडिंगनंतर प्रवासी म्हणाले- वैमानिकच आमचा हीरो.
  > या घटनेनंतर मंडाले विमानतळाचे संचालन अडीच तास बंद करण्यात आले. विमानाची तपासणी सुरू आहे.

  बांगलादेशचे विमानही घसरले होते
  म्यानमारमध्ये आठवडाभरात दुसरा विमान अपघात टळला आहे. बुधवारी बांगलादेश एअरलाइन्सचे विमान यांगून विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरले होते. तेव्हा १७ प्रवासी जखमी झाले होते.

Trending