आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Leaving Bollywood Industry, Now Zaira Wasim Will Not Be Promoting Her Upcoming Movie 'The Sky Is Pink'.

बॉलिवूड सोडल्यानंतर आता आपला आगामी चित्रपट 'द स्काय इज पिंक' चे प्रमोशनदेखील करणार नाही जायरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जायरा वसीमने बॉलिवूड सोडल्याच्या निर्णयाने सर्वानाच हैराण केले आहे. रविवारी (30 जून) तिने सोशल मीडियावर घोषणा केली की, ती बॉलिवूडमध्ये काम करणार नाही. जायराने या निर्णयामागे असा तर्क दिला आहे की, मला या क्षेत्रात काम करून आनंद मिळाला नाही कारण हे माझ्या धार्मिक विश्वासांमध्ये हस्तक्षेप करत आहे. दंगल आणि सीक्रेट सुपरस्टारसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या जायराने अशातच 'द स्काय इज पिंक'चे शूटिंग पूर्ण केले आहे. तिच्या या घोषणेनंतर हे समोर येत आहे की, ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचाही भाग नसेल. 

 

मेकर्सला जायराने दिला नकार... 
मिड डेच्या रिपोर्टनुसार, आपला निर्णय सार्वजनिकपणे सांगितल्यानंतर जायराने 'द स्काय इज पिंक'च्या मेकर्ससोबत बातचीत केली आणि त्यांना सांगितले की, ती ऑगस्टमध्ये होणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भाग घेणार नाही. सूत्रांनुसार, जायराने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका प्रोफेशनलप्रमाणे शूटिंग पूर्ण केले पण आता ती कोणत्याही प्रकारे या चित्रपटाचा भाग होऊ इच्छित नाही. मेकर्सलादेखील तिचा हा निर्णय माहित आहे त्यामुळे कुणी तिच्यावर दबाव टाकत नाही. त्यामुळेच मेकर्सने हे ठरवले आहे की, या चित्रपटाचे बाकीचे स्टार्स जसे की, प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर प्रमोशनल इव्हेंट्सचा भाग बनणार आहे.   

 

बायोपिक आहे 'द स्काय इस पिंक'... 
हा चित्रपट एक बायोपिक आहे. जो सोनाली बोस दिग्दर्शित करत आहे. चित्रपट मोटिवेशनल स्पीकर आयशा चौधरीवर बनवली गेली आहे. आयशा कमी वयातच फुफुसांशी निगडित एका गंभीर आजाराची शिकार झाली आहे. यामध्ये प्रियांकाव्यतिरिक्त फरहान अख्तर आणि जायरा वसीमदेखील लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...