आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • After Leaving Engineering Education He Focused On Animation; 'Mask Badshah' Is Get Famous On YouTube In A Short Time, Youth Success Story

अभियांत्रिकी शिक्षण साेडून अॅनिमेशनवर भर; अल्पावधीत यूट्यूबवर 'मास्क बादशहा', पुण्यातील तरुणाची यशकथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रशांतचे अभ्यासात मन रमत नव्हते. ताे तासन‌्तास इंटरनेटवर घालवायचा. काही तरी वेगळे करायच्या उद्देशाने त्याने यू-ट्यूबवर अॅनिमेशन क्लिप करून टाकण्यास सुरुवात केली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेता घेता त्याने सुरुवातीला गेमिंग, मॅजिक, टेक्निकल, परीक्षेशी संबंधित असे वेगवेगळे सात चॅनल सुरू केले, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, तरीही ताे खचला नाही. नंतर शिक्षण मध्येच साेडून यू-ट्यूबच्या माध्यमातून एक मास्क घातलेले स्वत:चेच पात्र 'अँग्री प्राश' तयार केले व ते वेगवेगळ्या विषयांवरील अॅनिमेटेड व्हिडिअाे जगासमाेर अाणले. या पात्राची तरुणाला चांगलीच भुरळ पडली असून केवळ अडीच वर्षांत त्याचे ३५ लाख चाहते झाले अाहेत. प्रशांत अाता यू-ट्यूबवरील मास्क बादशहा बनला अाहे.

प्रशांत हा २४ वर्षीय तरुण मध्यमवर्गीय कुटुंबातील. वडील लेबर काँट्रॅक्टर, तर अाई गृहिणी. प्रशांत अभ्यासापेक्षा इंटरनेटवर जास्त रमायचा. स्वत:च अॅनिमेशन काॅर्टून बनवून ते यू-ट्यूबवर अपलाेड करायचा. त्याने तयार केलेल्या काॅमेडी व्हिडिअाेमधील पात्रे लाेकांना अावडू लागली. मग, त्याने व्हिडिअाेसाठी स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली. दाेन खाेल्यांच्या किरायाच्या घरात हे कुटुंबीय राहायचे. त्यामुळे कुटुंबीयांसमाेर व्हिडिअाे करणे त्याला जमत नव्हते. अखेर मित्रांच्या घरी रात्री जाऊन फिल्म मेकिंग साॅफ्टवेअरच्या साहाय्याने प्रशांतने व्हिडिअाे बनवले व ते अपलाेड केले. कालांतराने यू-ट्यूबवर एक लाख चाहत्यांचा टप्पा अाेलांडल्यानंतर प्रशांतने करिअरच्या दृष्टीने काेणत्या कंपनीचा पाठिंबा मिळताे का हे पाहण्याकरिता थेट मुंबई गाठली. त्या ठिकाणी 'नाे फ्लिटर' या कंपनीने त्याला अॅनिमेशनमध्ये व्यवसाय कशा प्रकारे करता येऊ शकेल हे सांगत पाठबळ दिले. मात्र, कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. अाधी शिक्षण पूर्ण कर, मग काय करायचे ते कर, असा त्यांचा तगादा हाेता. परंतु, प्रशांतने यू-ट्यूबच्या माध्यमातून पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला. काॅमेडी, रॅप साँग, मॅजिक अशा प्रकारचे दर्जेदार व्हिडिअाे तयार करून ते यू-ट्यूबवर अँग्री प्राश या मास्क घातलेल्या पात्राच्या माध्यमातून रेखटण्यास सुरुवात केली. केवळ भारतातूनच नव्हे, तर बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, यूएई या देशांतही त्याचे चाहते निर्माण झाले. अँग्री प्राशने अद्याप स्वत:ची अाेळख लपवली अाहे.

खरी अाेळख समाेर अाणायची नाही

थ्री डी अॅनिमेशनचे मास्क बनवूनच त्याने सर्व व्हिडिअाे अपलाेड केलेले असल्याने नेमका अँग्री प्राश अाहे तरी काेण? याची उत्सुकता चाहत्यांना अाहे. अँग्रीप्राश पात्राने स्वत:ची अाेळख निर्माण केली असून मला दुसरी अाेळख नकाे असल्याने मास्क लावत असल्याचे प्रशांतने सांगितले. 'करिअरच्या नवीन वाटा शाेधल्या अाणि त्यावर मेहनत केली तर यश मिळू शकते. पब्जी गेमसारखे 'प्राश गेमिंग' मी सुरू केले असून त्यालाही तरुणाई प्रचंड प्रतिसाद अाहे. 'जरा हटके' या चॅनेलच्या माध्यमातून विविध वेगळ्या गाेष्टींची मांडणी अनाेख्या स्वरूपात करत असून रॅप गाणी ही लाेकप्रिय हाेत अाहे. त्याचप्रमाणे वेब सिरीजचे लिखाण सध्या करत असून लवकरच तीही प्रकाशित करणार अाहे,' असेही ताे म्हणाला.