आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथने लग्नानंतर साजरी केली पहिली लोहरी, पाहा फोटोज 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा नवीन शोमध्ये कमबॅक केले आहे. त्याचा हा शो सध्या छोट्या पडद्यावर सर्वांचेच मनोरंजन करत आहे. तर कपिल शर्माने आपल्या शोच्या दूस-या सीजनपुर्वी गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न केले आहे. तो लग्नानंतर आपली पत्नी गिन्नीसोबत लोहरी साजरी करताना दिसला. त्याच्या या सेलिब्रेशनला खास बनवण्यासाठी कपिलची पुर्ण टीम एकत्र लोहरी साजरी करताना दिसली. कपिलची फ्रेंड भारतीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये कपिलसोबतच कृष्णा, अभिषेक, भारती आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया आणि अनेक मित्र लोहरी सेलिब्रेट करताना दिसत आहेत. 

भारतीने फोटो शेअर करत लिहिले की, "पहिल्या लोहरीच्या शुभेच्छा गिन्नी चतरथ, कपिल शर्मा. तुमच्यावर सदैव देवाची कृपा असावी." तर या फोटोमध्ये सर्व टीम कपिलची फेव्हरेट स्टेप 'बाबा जी का ठुल्लू' करताना दिसतेय. फोटोमध्ये कपिल आणि त्याचे मित्र खुप आनंदी दिसत आहेत.

 

कपिल शर्मा 12 डिसेंबर 2018 ला गिन्नीसोबत विवाह बंधनात अडकला होता. त्याने हिंदू धर्मानुसार लग्न केले होते. तो पंजाब येथे राहणारा आहे. त्याने गिन्नी चतरथ या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले. 


 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy 1st lohri @kapilsharma @ginnichatrath god bless you❤️❤️❤️❤️😇😇😇😇😇😇😘

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on Jan 12, 2019 at 11:33pm PST

 

बातम्या आणखी आहेत...