आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Meeting Prime Minister Modi, Mamata Said: "We Are Against The CAA And The NRC

ममतांनी घेतली मोदींची भेट, राजभवनात २० मिनिटे झाली चर्चा; सीएए, एनआरसी मागे घेण्याची केली मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यभरात राजकीय पक्षांची मोदी गो-बॅकची घोषणाबाजी
  • वयाची 100 वर्षे पूर्ण केलेल्या कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 2 पेंशनकारांचा केला सन्मान

कोलकाता  - नव्या नागरिकत्व कायद्याच्या (सीएसए) विरोधात निदर्शने होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी दोनदिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यास सुरुवात झाली. कोलकातामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची राजभवन येथे भेट घेतली. भेटीनंतर ममता म्हणाल्या, आर्थिक मागण्यांसह मी पंतप्रधानांकडे सीएए, एनआरसी, एनपीआरच्या मुद्यावर भूमिका मांडून विरोध दर्शवला. सीएए तसेच एनआरसीला माझे समर्थन नाही. त्यामुळेच हे मागे घेतले जावे, असे मी निक्षूण सांगितले. भेटीनंतर ममता आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघून गेल्या. तेथेही भाषणात त्यांनी सीएए लागू होणार नसल्याचा दावा केला. पंतप्रधान मोदींनी कोलकातामध्ये ४ ऐतिहासिक इमारतींचे लोकार्पण केले. याप्रसंगी ते म्हणाले,  बांगला भूमी व पवित्र सुगंधाला नमन करण्याची ही वेळ आहे. आकाशात भलेही एक चंद्र आहे. परंतु, बंगालने जगाला सुभाषचंद्र, ईश्वरचंद्र यांच्यासारखे अनेक चंद्र दिले. तारुण्यावस्थेतही बंगालच्या भूमीने मला आकर्षित केले होते. भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याला जगासमोर मांडण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. त्यातून सांस्कृतिक पर्यटनाला गती मिळू शकेल.बिप्लबी संग्रहालयाची स्थापना व्हावी : मोदी


मोदी म्हणाले, कोलकाता भारताच्या सर्वोच्च सांस्कृतिक ठिकाणांपैकी आहे. येथील ४ ऐतिहासिक इमारती आेल्ड करन्सी बिल्डिंग, बेलवेडर हाऊस, मेटकाफ हाऊस व व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहेत. एक संग्रहालय‘बिप्लबी भारत’ची देखील जरूर स्थापना व्हायला हवी. त्यात सुभाषचंद्र बोस, अरबिंदो घोष, रासबिहारी बोस, खुदीराम बोस इत्यादी नावांना स्थान मिळायला हवे. 
 

१०० वर्षीय दोन माजी कर्मचाऱ्यांचा गौरव 

मोदी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० वर्षपूर्ती समारंभात सहभागी होतील. कोलकाता पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी व माजी कर्मचाऱ्यांच्या संकटातील निवृत्ती निधीसाठी पंतप्रधान ५०१ कोटी रुपयांचा धनादेश सोपवणार आहेत. मोदींच्या हस्ते निवृत्तिधारक नगीना भगत (१०५) व नरेशचंद्र चक्रवर्ती (१००) यांचा गौरव करण्यात येईल. मोदी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या गीताचेही प्रसारण करतील.