आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडच्या निधनानंतर बॉयफ्रेंडचा तडफडुण मृत्यु, आधी केला खून नंतर केली आत्महत्या..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतामढी(बिहार)- प्रेमात अपयशी झाल्यामुळे 24 डिसेंबरला आपल्या गर्ल फ्रेंडचा बंदुकूची गोळी झाडून खून केल्यानंतर स्वत:च्या डोक्यात गोळी मारून घेतलेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तीन दिवस चाललेल्या या उपचारानंतर युवकाने मुजफ्फरनगरच्या एका खासगी रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 


खून व आत्महत्येसाठी बंदुक कुठुण आले याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस युवकाच्या मित्रांची शोध घेत आहेत. घटनेला चार दिवस उलटुनही पोलिसांना अजून यश आलेले नाहीये. पोलिस सध्या त्या युवकांचे मोबाईल फोन ट्रेस करत आहेत.


दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार होती पुजा
भवदेपुर मेला रोडवर असलेल्या हॉटल सम्राटच्या रूम नंबर 302 मध्ये 24 डिसेंबरच्या सकाळी सूरजने पूजाला गोळी मारून तिचा खून केला, आणि स्वत:लाही शूट केले. गंभीर स्थितीत त्याला खासगी रूग्णालयात भर्ती करतण्यात आले, तेथे उपचारा दरम्यान त्याया मृत्यु झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार पुजाचे दुसऱ्या एका मुलासोबत लग्न ठरले होते. पण सुरजला तिच्यापासून वेगळे व्हायचे नवह्ते. यावर बोलण्यासाठी त्याने पुजाला हॉटेलमध्ये बोलवले आणि तिचा खून केला. त्यानंतर पोलिस पकडतील या भितीने त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली.

बातम्या आणखी आहेत...