आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Northeast Violence In Bengal, Protesters Burned Rail buses, NSF Shut Down Six Hours In Assam, Protesters Burned Driver In Assam

ईशान्येनंतर प. बंगालमध्ये हिंसाचार, समाजकंटकांनी रेल्वे-बस पेटवल्या, एनएसएफचा आसाममध्ये सहा तासांचा बंद, आसाममध्ये आंदोलकांनी चालकास पेटवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 राज्यांत निदर्शने, आसामात संचारबंदी, इंटरनेटवर बंदी
  • आसाममध्ये विद्यार्थी संघटनांची सत्याग्रहाची घोषणा

​​​​​​नवी दिल्ली/ गुवाहाटी : नागरिकत्व कायद्यावरून ईशान्य व उर्वरित राज्यांत शनिवारी देखील आंदाेलन सुरूच हाेते. ईशान्येकडील ५ राज्यांत सहाव्या दिवशीही तीव्र निदर्शने झाली. पश्चिम बंगालच्या अनेक भागांत हिंसक आंदाेलन झाले. आंदाेलकांनी हावडा जिल्ह्यात एक रेल्वे व बसस्थानक पेटवून दिले. त्याशिवाय आंदाेलकांनी रस्त्यावर उतरून काेना एक्सप्रेस मार्गावर १५ बसेसला आग लावली आणि पाेलिस व्हॅनही पेटवून दिली. आसाममध्ये आंदोलकांनी एका बस चालकाला पेटवून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

कायदा हाती घेऊ नका. रस्ते अडवणे, लाेकांना त्रास हाेईल असे काही करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. सरकारी संपत्तीचे नुकसान करू नये. शांतता भंग करणाऱ्या सर्व दाेषींच्या विराेधात कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे शनिवारी संचारबंदी ७ तासांसाठी शिथिल करण्यात आली. इंटरनेट सेवेवरील बंदी साेमवारपर्यंत वाढवली आहे. आॅल आसाम स्टुडंट्स युनियनने (आजसू) ३ दिवसांच्या सत्याग्रहाची घाेषणा केली आहे. आसामला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागा स्टुडंट्स फेडरेशनने (एनएसएफ) शनिवारी ६ तासांचा बंद पुकारला हाेता. मेघालयताही माेबाइल व इंटरनेट सेवा राेखण्यात आली. अनेक भागांत निदर्शने झाली. शिलाँगमधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्रिपुरातील परिस्थिती वेगाने सामान्य हाेत आहे. अरुणाचलमध्ये अनेक भागांत निदर्शने झाली. ईशान्येतील तीव्र विराेधामुळे अमेरिका, ब्रिटन व इस्रायलने आपल्या नागरिकांना भारतात जाण्यासंबंधीची अॅडव्हायझरी जारी केली आहे. फारशी गरज नसल्यास भारताचा दाैरा टाळावा, असे या देशांनी आपल्या नागरिकांना सांगितले आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली हाेती.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात ४२ विद्यार्थी ताब्यात

- दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व कायद्याच्या विराेधात निदर्शने झाली. पाेलिसांनी ४२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने सर्व परीक्षांना पुढे ढकलले. त्याशिवाय विद्यापीठात १६ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह चेन्नईतही नागरिकत्व कायद्याच्या विराेधात निदर्शने झाली.
- भाजपची दिल्ली, मुंबई, बंगळुरू, काेलकाता, गुवाहाटी, लखनऊमध्ये १४-१८ डिसेंबर कायद्याबाबत जागृती माेहीम

प. बंगाल : हावडामध्ये १५ बसेस आंदोलकांनी दिल्या पेटवून

छायाचित्र हावडा जिल्ह्यातील आहे. समाजकंटकांनी १५ बसेसला पेटवून दिले. संकरेल रेल्वे स्थानकाची जाळपोळ झाली. मुर्शिदाबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ ठप्प होता. तेथे तीन बसची तोडफोड करण्यात आली.

आसाम : सहा दिवसांपासून प्रवासी अडकले

छायाचित्र गुवाहाटी रेल्वे स्थानकाचे आहे. सहा दिवसांपासून प्रवासी अडकून पडले आहेत. ईशान्येतील सर्वच स्थानकावर अशी स्थिती आहे. प्रवाशांना हलवण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...