आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- तब्बल दीड वर्षानंतर पेट्राेलचे दर ७५ रुपयांखाली आल्याचा सुखद अनुभव बुधवारी नाशिककरांनी घेतला. बुधवारी शहरात पेट्राेलचे दर प्रति लिटरसाठी ७४.७८, तर डिझेलचे दर ६५.०१ रुपये हाेते. विशेष म्हणजे, २३ जून २०१७ ला म्हणजे १८ महिन्यांपूर्वी शहरात पेट्राेलचे दर हाेते ७४.६३ रुपये. यानंतर मात्र इंधन दरवाढीला सुरुवात झाली ती नाेव्हेंबर २०१८ पर्यंत कायम हाेती. या दीड वर्षाच्या काळात ४ ऑक्टाेबर २०१८ ला पेट्राेलचे दर अगदी ९२ रुपयांपर्यंत पाेहाेचले हाेते. त्यामुळे देशभरात जनतेमध्ये संतापाची लाट उसळल्याने केंद्र व राज्य शासनाने पाच रुपये प्रति लिटरपर्यंत कर कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला हाेता.
गेल्या वर्षभर वेगाने वाढत गेलेले पेट्राेल-डिझेलचे दर कमी हाेण्याचे प्रमुुख कारण आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले क्रृड ऑइलचे दर मानले जात आहेत. तेल उत्पादक देशांमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन माेठ्या प्रमाणावर वाढले असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाचे दरांत घसरण हाेत असल्याचे पहायला मिळते आहे. याचमुळे मागीलवर्षी थेट ९२ रुपयांपर्यंत गेलेले पेट्राेलचे दर आज ७४ रुपयांच्या आसपास आले आहेत. हे दर आणखी कमी हाेण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, जनतेच्या मागणीप्रमाणे इंधन जीएसटीच्या कक्षेत आणले गेले तर माेठा दिलासा मिळू शकताे, मात्र सरकारकडून याबाबत ब्र शब्द काढला जात नसल्याने नाराजीचा सूर दिसून येत आहे.
डाॅलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती
२०१३- ६२.६० रुपये
२०१४ - ६१.९३ रुपये
२१०५ - ६५.५० रुपये
२०१६ - ६६.५९ रुपये
२०१७ - ६५.३१ रुपये
आंतरराष्ट्रीय स्थिती जबाबदार
तसे बघितले तर दीड वर्षात रुपयाच्या बदल्यात डाॅलर तितका खाली आलेला नाही. मात्र, वाढलेले कच्च्या तेलाचे उत्पादन भारतातील इंधनाचे दर कमी हाेण्यास सहाय्यभूत ठरत आहेत. भविष्यात देशात इलेक्ट्रिक कार्स आल्या तर इंधन आणखी स्वस्त मिळू शकेल. - विश्वनाथ बाेदाडे, आर्थिक विषयातील तज्ज्ञ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.