आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात नव्या मुख्यमंत्री पदाबद्दल भाजप-मित्र पक्षांत एकमत नाही; काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री तसेच माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारीसाठी रविवारपासूनच बैठकांना वेग आला आहे. तरीही सत्ताधारी भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर एकमत होत नाही. भाजप आणि मित्र पक्षांच्या या बैठकांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा आहेत. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (एमजीपी) चे आमदार सुदीन धवलीकर मुख्यमंत्री बनू इच्छित आहेत. त्यामुळे, यासंदर्भातील चर्चा सध्या थांबवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेसने राज्यात सरकार स्थापनेचा दावा प्रस्तुत केला आहे.

 

युतीचा नेता होणार मुख्यमंत्री -भाजप
लोबो यांनी सांगितल्याप्रमाणे, धवलीकर स्वतःच मुख्यमंत्री होण्यास इच्छूक आहेत. परंतु, भाजपला असे वाटते की मुख्यमंत्री हा युतीचा नेता व्हावा. भाजप नेत्यांनी विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी सूचविली आहेत.


आमचा पाठिंबा पर्रिकरांना होता भाजपला नाही...
तर दुसरीकडे, गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी सांगितले, की भाजपा-मित्र पक्षांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदावर निर्णय होत नाही. आमचा पाठिंबा भाजपला नव्हे, तर पर्रिकरांना होता. आता ते या जगात नाहीत. त्यामुळे, सर्वच पर्याय खुले आहेत. गोव्यात स्थैर्य यावे आणि विधानसभा बरखास्त होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही भाजपच्या पुढील पावलाची प्रतीक्षा करत आहोत. पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा कशी भरून काढली जाईल हा सर्वच सहकारी पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष अर्थात जीएफपीचे गोव्यात 3 आमदार आहेत.

 

सरकार स्थापनेसाठी अनेक नेते आमच्या संपर्कात -काँग्रेस
गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडांकर यांनी सांगितले की अनेक बिगर काँग्रेसी आमदार सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आम्ही व्यूहरचना तयार करत आहोत. राज्यपाल मृदुला सिन्हा आम्हाला लवकरच सरकार स्थापनेचे आमंत्रण देतील अशी अपेक्षा आहे. याच दरम्यान राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत बाबू कवळेकर यांनी सांगितले, की पर्रिकरांच्या निधनानंतर आता भाजपकडे कुठलाही सहकारी उरलेला नाही. त्यामुळे, राज्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असून आम्हाला सरकार स्थापनेची संधी द्यावी.

 

सरकार स्थापनेसाठी अनेक नेते आमच्या संपर्कात -काँग्रेस
गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडांकर यांनी सांगितले की अनेक बिगर काँग्रेसी आमदार सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आम्ही व्यूहरचना तयार करत आहोत. राज्यपाल मृदुला सिन्हा आम्हाला लवकरच सरकार स्थापनेचे आमंत्रण देतील अशी अपेक्षा आहे. याच दरम्यान राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत बाबू कवळेकर यांनी सांगितले, की पर्रिकरांच्या निधनानंतर आता भाजपकडे कुठलाही सहकारी उरलेला नाही. त्यामुळे, राज्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असून आम्हाला सरकार स्थापनेची संधी द्यावी. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत सध्या 36 आमदार आहेत. त्यातील भाजप आमदार फ्रान्सिस डिसूझा यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. तर काँग्रेसच्या दोन आमदारांनी गतवर्षीच राजीनामा दिला.

बातम्या आणखी आहेत...