आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्राेलपाठाेपाठ सणासुदीच्या दिवसांत वीज दरवाढीचा ‘शॉक’; प्रतियुनिट २० ते २५ पैसे भार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पेट्रोलच्या दरात वाढ हाेत असतानाच अाता सणासुदीत महावितरणने वीज दर वाढवून धक्का दिलाे. मुंबईतील बेस्टचे वीज दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी झाले, तर राज्यातील इतर भागात टाटा  व महावितरणने मात्र वीज दरात वाढ केली. 


कृषी क्षेत्राचे वीज दर ३ रुपये ३५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रति युनिट करण्यात आल्याने शेतकऱ्यांवरही बाेजा पडेल. १ सप्टेंबरपासूनच हे दर लागू हाेत असल्याचे वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी  सांगितले.


कृषी क्षेत्राचे वीजदर प्रतियुनिट ३.३५ रुपयांवरून ३.५५ रु. करण्यात अाले. तर घरगुती ग्राहकांचे ० ते १०० युनिटसाठी ५.०७ रुपयांवरून ५.३१ रु. अाणि १०१ ते ३०० युनिटसाठी ८.७४ रु.वरून ८.९५ पैसे दर केले.


इलेक्ट्रिक वाहन वापरासाठी प्रोत्साहन
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरात अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट ६ रुपये दर ठरवण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) ७० रुपये प्रति केव्हीए/ महिना असा ठरवण्यात आला आहे.


पेट्रोलच्या दरनिश्चितीत हस्तक्षेप नाहीच : काेर्ट 
नवी दिल्ली छ इंधनाचा रोज बदलता दर सरकारचा आर्थिक विषय असल्याचे सांगून हस्तक्षेप करण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला. 

बातम्या आणखी आहेत...