आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Playing The Old Woman's Role In 'Sand Ki Ankh' Tapasi Get Trolled, Now She Replied 'I Quit Acting ...'

'सांड की आंख' मध्ये वृद्ध महिलेचा रोल केल्यामुळे झाली निंदा, तापसीचे उत्तर - 'मी अभिनय करणे सोडून देते...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर आगामी चित्रपट 'सांड की आंख' मध्ये वृद्ध शूटर प्रकाशी आणि चंद्रो तोमर यांच्या भूमिका साकारत आहेत. यामुळे अनेकजण त्यांची निंदादेखील करत आहेत. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान आणि नीना गुप्ता यांनी अशातच एका स्टेटमेंटमध्ये म्हणले होते की, 'तापसी आणि भूमीने आपल्या वयाचे दिल्ली गर्ल्सचे रोल करणेच उत्तम राहील.' यावर आता तापसीची प्रतिक्रिया समोर आली आहे.  

मी अभिनय करणे सोडून देते : तापसी
तापसीने एका बातचीतीमध्ये गतकाळातील अभिनेत्रींच्या स्टेटमेंटचे उत्तर देत म्हणाली, "एक काम करते, मी अभिनय करणे सोडून देते आणि केवळ दिल्लीच्या राहणाऱ्या आणि आपल्या वयाच्या मुलींचे रोल करते. आम्ही कलाकार आहोत...तर आम्ही अभिनय सोडून दिला पाहिजे का ? अभिनेत्री असल्याच्या नात्याने मी कधी कधी इतर वयाचे रोलदेखील करेन. मला वाटते की, कॅमेरा अॅक्टर्स बनणे सोडले पाहिजे. मला माहित आहे की, हे दाखवणे सोपे नाहीये, कारण या महिला 60 च्या वयामध्ये बंदूक उचलतात आणि आणि अर्ध्या चित्रपटात त्यांच्या वर्तमानातील वयाची कहाणी आहे."

हे म्हणाल्या होत्या वेटरन अॅक्ट्रेसेस... 
एका न्यूज वेबसाइटसोबत बातचीत करताना सोनी राजदान म्हणाली होती, "मला या दोन्ही अभिनेत्री खूप अवडतात. पण का ? मला वाटते की, हे बॉक्स ऑफिससाठी आहे. पण तुम्ही 60 वर्षांच्या व्यक्तीच्या भूमिका असलेले चित्रपट बनवतातच का, जर ते खऱ्या वयाच्या अॅक्ट्रेसेसला कास्ट नाही करू शकत ?" तसेच नीना गुप्ता यादेखील म्हणाल्या होत्या, "हा बिजनेस आहे. ते त्यांनाच घेतात जे त्यांच्या प्रोजेक्टसाठी योग्य असतात. होऊ शकते की, आम्ही (वयस्कर अॅक्टर्स) विकू शकलो नसतो." नीनाने यापूर्वीही एका ट्वीटमध्ये प्रश्न विचारात लिहिले होते, "आमच्या वयाच्या भूमिका तरी कमीत कमी आमच्याकडून करून घ्या."

निंदेने फरक पडत नाही : तापसी... 
तापसी म्हणते की तिला निंदेने काहीही फरक पडत नाही. तिच्या शब्दात, "मी माझ्या करियरच्या या वळणावर वयस्कर महिलेच्या भूमिकामुळे होणाऱ्या निंदेने खूप खुश आहे. होऊ शकते की, लोकांनी मला वेगवेगळ्या प्रकारच्या यंग रोलमध्ये पहिले आहे. त्यामुळे त्यांना ही भूमिका पचवता येत नाहीये."

'आईला लक्षात ठेऊन केला रोल'
तापसी म्हणाली, "जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकत होते, तेव्हा माझ्या डोक्यात माझ्या आईचाच विचार येत होता. मी 2 तास रडत होते. प्रत्येक क्षण मला माझ्या आईची आठवण करून देत होता. जशी माझी रील आई म्हणते - मी माझ्या मुलींना तसे आयुष्य जगू देणार नाही जसे मी काढले. मग त्यासाठी मला 60 वर्षे वयात बंदूक उचलावी लागली तरी मी तेही करेन."