आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. 1980 साली रिलीज झालेला चित्रपट 'शान' मध्ये व्हिलेनची भूमिका साकारुन प्रसिध्द झालेले कुलभूषण खरबंदा हे लेक श्रुतीचे लग्न करणार आहेत. रिसपोर्ट्सनुसार, 17 डिसेंबरला श्रुतीही रोहित नेवलसोबत लग्न करणार आहे. हे लग्न जोधुरपूरच्या भवन पॅलेसमध्ये होणार आहे. या ठिकाणी 2 डिसेंबरला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे लग्न निक जोनाससोबत होणार आहे.
दोन दिवस सुरु राहणार फंक्शन, लग्नात पोहोचू शकतो आमिर खान
- श्रुती आणि रोहितच्या लग्नाचे फंक्शन दोन दिवस सुरु राहणार आहेत. 16 डिसेंबरला मेंदी आणि संगीत सेरेमनी असेल. तर 17 डिसेंबरला सकाळी हळद आणि संध्याकाळी लग्नाच्या विधी होतील. प्रत्येक फंक्शनसाठी स्वतंत्र ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे असे बोलले जातेय. पाहूण्यांना संगीतसाठी वेस्टर्न, हळदीसाठी एथनिक आउटफिट घालावा लागणार आहे. सूत्रांनुसार कुलभूषणसोबत 'जो जीता वही सिकंदर' आणि 'लगान' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला आमिर खानही या लग्नात सहभागी होऊ शकतो.
ऑगस्टमध्ये झाली आहे श्रुतीची एंगेजमेंट
- श्रुतीने यावर्षी ऑगस्टमध्ये रोहित नेवलसोबत साखरपूडा केला. याची अनाउंसमेंट तिने सोशल मीडियावर केली होती. श्रुतीने साखरपुडाचा एक फोटो शेअर करत "Not only do you make me smile more than I used to, you’ve managed to make it bigger & brighter too". असे लिहिले होते.
पुण्यामध्ये राहते श्रुती
- कुलभूषण खरबंदाच्या पत्नीचे नाव माहेश्वरी देवी खरबंदा आहे. त्यांची मुलगी श्रुतीविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. पण ती पुण्यात राहते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती ज्वेलरी डिझाइनर आहे. स्वतः कुलभूषनने मुलाखती दरम्यान सांगितले होते की, "माझी एक मुलगी आहे, जिच्यासोबत मी फ्लर्ट करु शकतो, जिची मी काळजी करतो आणि तिच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करु शकतो. मग ही गोष्ट तिच्या प्रोजेक्टसंबंधीत असेल किंवा मग तिच्या बॉयफ्रेंडसंबंधीत असू शकते. माझ्या गर्लफ्रेंडविषयीही मी तिच्यासोबत डिस्कस करु शकतो.(मिश्किलपणे) प्लेची रिहर्सल करताना मी कॅरेक्टरशी कनेक्ट कसे होऊ शकतो याविषयी विचार करतो."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.