आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलवामानंंतर ६८ दिवसांत ४१ अतिरेक्यांचा खात्मा, जैशच्या २५ अतिरेक्यांचा समावेश; लष्कर व पोलिसांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर  - सुरक्षा दलाने पुलवामा हल्ल्यानंतर ६८ दिवसांत ४१ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात जैश-ए-माेहंदच्या २५ अतिरेक्यांचा समावेश आहे. लष्कर व जम्मू-काश्मीरचे पाेलिस यांची संयुक्त पत्रकार परिषद बुधवारी घेण्यात आली. त्यात ही माहिती देण्यात आली. लेफ्टनंट केजेएस ढिल्लन म्हणाले, यंदा जानेवारीपासून आतापर्यंत ६९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे, तर १२ अतिरेक्यांना पकडण्यात आले. गेल्या वर्षी राज्यात लष्कर व पाेलिसांनी २७२ अतिरेक्यांना ठार केले हाेते. आता काश्मीर खाेऱ्यात जैशचा कमांडर हाेण्यास काेणीही धजावत नाही. असे असूनही पाकिस्तानची मदत व फूस सुरूच आहे. आपण सातत्याने जैशचा नायनाट करत आहाेत. विशेषत: पुलवामा हल्ल्यानंतर लष्करी कारवाई वाढली. गेल्या तीन महिन्यांत १३ पाकिस्तानी अतिरेकी ठार केले. राज्याचे पाेलिस महासंचालक दिलबाग सिंह याप्रसंगी म्हणाले, दहशतवादी संघटनांनी आता काश्मीरच्या तरुणांचे भरती हाेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उलट तरुणांना पाेलिसांत भरती हाेण्यात रस वाटू लागला आहे. पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली हाेती. 
 

 

पाकला गेलेले १० काश्मिरी अतिरेकी व्यापारात सामील, रसद पुरवली
 

> बदाम व मेवा विकण्याआडून साथीदारांना रसद पुरवत 

पाकिस्तानला गेलेले १० काश्मिरी दहशतवादी नियंत्रण रेषेवरील व्यापारात सामील हाेते. हे दहशतवादी बदाम, सुकामेवा, आंब्याच्या व्यापाराआडून आपल्या साथीदारांपर्यंत पैसे पाेहाेचवत हाेते. एलआेसीवर या अतिरेक्यांना मदत करत हाेते. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने त्याचा खुलासा केला

 

> ४ रावळपिंडीत राहिले, एक अतिरेकी इस्लामाबादमध्ये

एलआेसीवर व्यापार करणारे १० काश्मीर दहशतवाद्यांपैकी इस्लामाबाद व ४ रावळपिंडीत राहिले. त्यात त्रालचा मेहराजुद्दीन भट, पंपाेरचा नजीर अहमद भट, बडगामचा बशरत अहमद, शाैकत अहमत बट, नूर अहमद भटही सामील आहेत. इतर काश्मिरी दहशतवादी खुर्शीद, इम्तियाज अहमद, आमिर, एजाज रहेमानी अशी त्यांची नावे हाेत. 
 

> सलामाबाद व चक्कन-दा-बागमधून मालाची देवाणघेवाण

भारताने गेल्या आठवड्यात एलआेसीवर व्यापार बंद केला हाेता. व्यापाराच्या बहाण्याने शस्त्र, मादक पदार्थ, नकली नाेटांची तस्करी हाेत हाेती. भारत-पाकदरम्यान नियंत्रण रेषेवर बारामुल्ला जिल्ह्यातील सलामाबाद व पूंछ जिल्ह्याच्या चक्कन-दा-बागमार्गे हा व्यापार हाेत हाेता. भारताने व्यापार थांबवला.

 

> पाक अतिरेकी वकारला पत्रकारांसमाेर आणले
बारामुल्लाचे एसएसपी अब्दुल कयुम यांनी दहशतवादी माेहंमद वकारला पत्रकार परिषदेसमाेर हजर केले. वकार पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा आहे. ताे जुलै २०१७ मध्ये भारतात घुसला हाेता. बारामुल्लात दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय करण्याचा त्याचा कट हाेता. ताे श्रीनगरहून कारवाया करत हाेता. 
 

बातम्या आणखी आहेत...