आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस काेठडी मिळताच माजलगावचे नगराध्यक्ष चाऊस यांचा रक्तदाब वाढला

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा रुग्णालयात काढली रात्र, गुरुवारी दिवसभर चौकशी
  • अटकेतील तिघांचेही नोंदवले जबाब, सह्यांचे नमुने घेतले

बीड - माजलगाव येथील नगरपालिकेतील तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहाल चाऊस यांना रात्रीचे आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र लागलीच त्यांचा रक्तदाब वाढल्याने उपचारासाठी त्यांना मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले. गुरुवारी सकाळी तिथून सुट्टी मिळताच पोलिस बंदोबस्तात त्यांना पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांंनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुरुवारी दिवसभर चाऊस, मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे आणि लेखापाल अशोक कुलकर्णी यांची चौकशी करण्यात आली. माजलगाव नगरपालिकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस व तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. दरम्यान बुधवारी रात्रीच चाऊस यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. दरम्यान तिथे गेल्यानंतर सहाल चाऊस यांचा रक्तदाब  वाढला. छातीत दुखत असल्याचे  त्यांनी सांगितल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. रात्रभर रुग्णालयात राहिल्यानंतर सकाळी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला.भेटण्यासाठी हितचिंतकांनी केली गर्दी  

दरम्यान, चाऊस, येलगट्टे आणि कुलकर्णी यांना भेटण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेत त्यांच्या हितचिंतकांनी गर्दी केली होती. पोलिस कोठडीत असलेल्या तिघांनाही हितचिंतकांना कसे भेटू दिले हा प्रश्न आहे. रुग्णालयातही पोलिसांनी चाऊसची बडदास्त ठेवली होती. 
 

दिवसभर नोंदवले जबाब :


दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या चाऊस, येलगट्टे, कुलकर्णी या तिघांनाही दिवसभर पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत ठेवण्यात आले होते. दिवसभर चौकशीसाठी म्हणून त्यांना थांबवून ठेवले. त्यानंतर तिघांच्या सह्यांचे नमुने आणि एक ते दोन पानी जबाब घेतले गेले. 
 

आज हजर करणार

तिघांचीही पोलिस कोठडी शुक्रवारी संपत आहे. त्यांचे जबाब व सह्यांचे नमुने घेतले गेले आहेत. आज त्यांना पुन्हा माजलगाव न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 
- प्रशांत शिंदे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा