आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाने हयातभराच्या कमाईचे 1 कोटी देश व समाजाच्या सेवेसाठी दान केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हवाई दलातून ४० वर्षांपूर्वी निवृत्ती घेणारे ७४ वर्षीय सीबीआर प्रसाद यांनी संरक्षण मंत्रालयाकडे हयातभराच्या वेतनातील १.०८ कोटी रुपये दान केले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे त्यांनी धनादेश सोपवला. याप्रसंगी प्रसाद म्हणाले, मी आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. देशाच्या संरक्षणासाठी काही तरी केले पाहिजे, असे मनात आले आणि निर्णय घेतला. माझ्या आयुष्यभरातील कमाईपैकी मुलीला २ टक्के व पत्नीला १ टक्का रक्कम दिली. उर्वरित ९७ टक्के देश व समाजाच्या सेवेसाठी देत आहे. 


त्यावर राजनाथ यांना दान देण्याचा निर्णय का घेतला, असे विचारले. त्यावर प्रसाद म्हणाले, हवाई दलात नोकरीला होतो. तेव्हा महान अभियंता जी.डी. नायडू एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. माझा भारत महान आहेे. इतर देशांपेक्षा आपली विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण कौटुंबिक जबाबदारी पार पाडल्यानंतर देश व समाजाच्या सेवेत योगदान दिले पाहिजे, असे नायडूंनी तेव्हा सांगितले होते. त्या विचारांनी प्रभावित होऊन हा निर्णय घेतला, असे प्रसाद यांनी सांगितले. मी नऊ वर्षे हवाई दलात होतो. पुढे निवृत्त झालो. त्यानंतर मी पोल्ट्री फार्म सुरू केले. गेल्या ३० वर्षांपासून व्यवसायाबरोबरच समाजाची सेवाही करत आहे. एकेकाळी माझ्या खिशात केवळ ५ रुपये होते. परंतु कष्टातून जीवनात ५०० एकर जमिनीची खरेदी केली. त्यापैकी ५ एकर पत्नीला व १० एकर मुलीला दिली. तुमचे कुटुंब या दानाच्या निर्णयावर सहजपणे तयार झाले होते? या प्रश्नावर प्रसाद म्हणाले, बिलकुल तयार झाले होते. कोणाला काहीही अडचण नव्हती. 


ऑलिम्पिक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण, क्रीडा विद्यापीठ सुरू करायचेय..
हवाई दलाचे माजी एअरमॅन प्रसाद म्हणाले, ऑलिम्पिक पदक जिंकण्याची इच्छा होती. परंतु ते प्रत्यक्षता येऊ शकले नाही. आता हे स्वप्न इतर मुलांकडून पूर्ण व्हावे असे वाटते. त्यासाठी क्रीडा विद्यापीठ सुरू केले आहे. परंतु आता मुला-मुलींसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. देशासाठी काहीतरी करण्याची उमेद पाहून या प्रसंगी उपस्थित अधिकारीही चकीत झाले.