Home | Gossip | After retiring from cricket, Yuvraj's wife Hajal said, 'One era ended, now proceed ...'

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजला म्हणाली पत्नी हेजल, 'एका युगाचा अंत झाला, आता पुढचा प्रवास करू...'

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 11:05 AM IST

हेजल आणि युवीने 2016 मध्ये केले होते लग्न... 

 • After retiring from cricket, Yuvraj's wife Hajal said, 'One era ended, now proceed ...'

  बॉलिवूड डेस्क : भारताला 2011 चे वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या युवराज सिंहने सोमवारी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ही घोषणा करत त्याने सांगितले, ‘माझे फॅन्स ज्यांनी नेहमी माझे समर्थन केले, मी त्यांचे किती आभार नाही मानू. माझ्यासाठी 2011 वर्ल्डकप जिंकणे, 'मॅन ऑफ द सीरीज' मिळणे स्वप्नासारखे होते. त्यानंतर मला कॅन्सर झाला. हे आकाशातून जमिनीवर येण्यासारखे होते. त्यावेळी माझे कुटुंब, माझे फॅन्स माझ्यासोबत होते.’

  इमोशनल पत्नी हेजलने लिहिली पोस्ट, 'युवराजने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याची पत्नी हेजल कीचने युवराजचा प्रेस कॉन्फरन्समधील एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'आणि... याप्रकारे एका युंगचा अंत झाला, स्वतःवर गर्व करा पतीदेव आणि नव्या प्रवासाची सुरुवात करा. लव्ह यू.'

  2016 मध्ये केले होते लग्न...
  30 नोव्हेंबर 2016 ला युवराज सिंहने अभिनेत्री हेजल कीचसोबत विधिवत लग्न केले होते. हेजल आणि युवराज यांची स्टोरीदेखील खूप फिल्मी आहे. एक वेळ अशी होती जेव्हा युवराज हेजलसाठी क्रेजी होता. त्याला तिच्याशी बोलायचे होते आणि मैत्री करायची होती. पण हेजलला तो आवडत नव्हता. मग साडे तीन वर्षानंतर हेजल युवीला भेटायला तयार झाली. त्यानंतर अनेक भेटीगाठींनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  कोण आहे हेजल?
  हेजल कीच ब्रिटिश अभिनेत्री आहे जिने काही हिंदी चित्रपटातही काम केले आहे. ती सलमान खान आणि करिना कपूर यांचा चित्रपट बॉडीगार्डमध्येही दिसली होती.

 • After retiring from cricket, Yuvraj's wife Hajal said, 'One era ended, now proceed ...'
 • After retiring from cricket, Yuvraj's wife Hajal said, 'One era ended, now proceed ...'

Trending