आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Roadshow Rahul Will File Nomination From Amethi Today

सोनिया, प्रियंकांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत आई सोनिया गांधी, बहिण प्रियंका गांधी, मेहुणे रॉबर्ट वाड्रा व त्यांची मुले होती. यावेळी बोलताना राहुल म्हणाले, की माझे अमेठीसोबत कौटुंबीक नातेसंबंध आहेत. मी मोठ्या फरकाने निश्चितच निवडून येणार आहे.
यावेळी काढण्यात आलेल्या रोड शोत अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी 500 किलो फुलांची राहुल गांधी यांच्यावर उधळण केली. दुसरीकडे, आपचे उमेदवार कुमार विश्वास हे 15 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल यांच्या जोरदार शक्तीप्रदर्शनाच्या कार्यक्रमामुळे विश्वास यांनी आज आपल्या प्रचाराचा मार्ग बदलला. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमेठीत 7 मे रोजी मतदान होणार आहे.
राहुल गांधी आज सकाळी 11 च्या सुमारास विशेष विमानाने सुलतानपूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी विराट रोड शो करीत अमेठी गाठले. येथील जिल्हा मुख्यालय गौरीगंज येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. रोड शोत राहुल गांधी यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणात काँग्रेस नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राहुल गांधी येथून सलग तिस-यांदा निवडणूक लढवित आहेत. यंदा राहुल यांच्याविरोधात भाजपकडून स्मृती इराणी तर आपकडून कुमार विश्वास रिंगणात आहेत.
पुढे वाचा, राहुल यांनी 2004 आणि 2009 साली किती मतांनी मिळवला होता विजय...