आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून 27 कोटींचे हीरे चोरणारा साधूच्या वेशात फिरत होता कुंभमेळ्यात, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सुमारे 26 कोटी 91 लाख रुपयांचे हीरे चोरणारा दलाल यतीश पिचडिया याला पोलिसांनी अटक केली. यतीश पिचडिया हा प्रयागराज येथील कुंभमेळ्यात साधूच्या वेशात लपला होता. त्याच्या गॅंगमधील पाच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी 21 कोटी रुपयांचे हीरे जप्त केले आहेत.

 

डीसीपी अनिल कुंभारे यांनी सांगितले की, मुंबईतील 23 व्यावसायिकांची हीरे घेऊन दलाल यतीश पिचडिया याच्यासह इतर आरोपींनी पोबारा केला होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात 11 ‍डिसेंबर 2018 रोजी तक्रार दाखल करण्यात वाली होती.

 

मुख्य आरोपी यतीश पिचडिया हा प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात साधूच्या वेशात फिरत होता.  पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता. सर्व आरोनी कल्याणला येण्यासाठी रेल्वे गाडीने निघाले. पोलिस आरोपींचा पाठलाग करत होते. आरोपी कल्याण स्टेशनवर उतरताच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 21 कोटी रुपये किमतीचे हीरे आणि 38 लाख रुपये कॅश जप्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...