आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Sambhaji Brigade Ncp Leader Jitendra Awhad Threatened Tanhaji Director Om Raut

अजय देवगणच्या तानाजी.. चित्रपटावर संकटाचे सावट, संभाजी ब्रिगेडनंतर आता जितेंद्र आव्हाडांची धमकी, म्हणाले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट आता वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने काही दृष्यांवर आक्षेप नोंदवला असून दृष्ये वगळली नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे म्हटले आहेत. संभाजी ब्रिगेडनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरवरुन दिग्दर्शक ओम राऊत यांना थेट धमकीच दिली आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी ओम राऊत यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप केला आहे. “ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर “याला धमकी समजली तरी चालेल,” असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात चित्रीत करण्यात आली आहे. मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणने “या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं आधीच स्पष्ट केलं होतं. आता दिग्दर्शक ओम राऊत जितेंद्र आव्हाडांच्या या धमकीला कसं उत्तर देणार हे बघावे लागेल.   

बातम्या आणखी आहेत...