आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Seeing 'Shahid', Shastri Ji Said, Make A Movie On 'Jai Jawan Jai Kisan'...

'शहीद' पाहून शास्त्रीजी म्हणाले... 'जय जवान जय किसान'वर चित्रपट बनवा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1965मध्ये रिलीज झालेल्या "शहीद'च्या प्रीमियरप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींसोबत मनोजकुमार व इतर चित्रपटांतील कलाकार. - Divya Marathi
1965मध्ये रिलीज झालेल्या "शहीद'च्या प्रीमियरप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींसोबत मनोजकुमार व इतर चित्रपटांतील कलाकार.

एंटरटेन्मेंट डेस्क : माझे लहानपण पाकिस्तानात गेले. तेथील तीस हजारी दवाखान्यामध्ये माझ्या भावाचा जन्म झाला. त्या वेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. त्यामुळे दंगलीचे वातावरण होते. ज्यावेळी दवाखान्यामध्ये दंगलग्रस्त यायचे त्यावेळी एक सायरन वाजायचा. ते ऐकून डॉक्टर, नर्स सर्व आत जाऊन लपून बसायचे. तेथे माझी आई आणि भाऊ दाखल होते. काही लोक आल्याचे समजल्यावर सायरन वाजले आणि सारे डॉक्टर, नर्स लपून बसले. यादरम्यान माझ्या भावाची तब्येत जास्त बिघडली आणि पाहता-पाहता डोळ्यासमोर त्यानेे जीव सोडला. माझी आई मोठमोठ्याने आेरडू लागली. मात्र डॉक्टर मदतीला आले नाही. ते पाहून मी जवळच पडलेली एक काठी घेतली आणि डॉक्टर, नर्सला मारू लागलो. नंतर आईला हे समजले तर ती नाराज झाली. तिने सांगितले हिंसेचा आधार कधीच घेऊ नको, तेव्हापासून आजपर्यंत मी कधीच त्या मार्गाने गेलो नाही. खरं तर, मी मुंबईला अभिनेता बनण्यासाठी आलो होतो, पण िलहिण्या-वाचण्याचा मला खूप छंद होता. मुंबईला येण्यापूर्वी दिल्ली प्रवासादरम्यान मी नई सडकला जायचो. तेथे साप्ताहिक मिळायचे. ते मी विकत घ्यायचो. कारण त्यात क्रांतिकारकांच्या वीरतेच्या कथा असायच्या. विशेषत: भगतसिंग यांच्याबाबत मला वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याबद्दलची ओढ असण्याचे एक कारण होते, ते म्हणजे एका नाटकात मी भगतसिंगांची भूमिका केली होती, परंतु ती उत्तम प्रकारे निभावता आली नव्हती. त्यामुळे वडीलदेखील रागावले होते. भगतसिंगांची भूमिकादेखील चांगली करू शकला नाही, असे ते मला म्हणायचे. त्यामुळे मी त्यांच्याबाबत खूप पूर्वीपासून लिहायला आणि संशोधन करण्यास सुरुवात केली होती. त्या काळात मी वर्तमानपत्रातील कात्रण काढून भगतसिंगांवर कोणती कलमे लागली होती याची माहिती घ्यायचो.

भगतसिंग यांच्यावर माझ्या चित्रपटाआधी काही सिनेमे आले होते. त्याच दिवसांत माझा मित्र पी कश्यपने निर्मिती क्षेत्रात येण्याची इच्छा बोलून दाखवली. मी म्हणालो, चल , आशा आणि साधनाजींसोबत बोलू आणि एक कथानक तयार करू. तो म्हणाला, नाही, तू भगतसिंग यांची जी कथा सांगितली त्यावरच चित्रपट तयार करू. मी म्हणालो, भगतसिंग यांच्यावर दोन चित्रपट यापूर्वी झाले आहेत. तरीदेखील 'शहीद'चे चित्रीकरण सुरू केले. प्रीमियरला लालबहादूर शास्त्री आले होते. त्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. मंचावर येऊन भाषणही दिले आणि आशीर्वाद दिले. त्यानंतर रात्री २ वाजता फोन आला, शास्त्रीजींना मला आणि माझ्या मित्राला चहासाठी आमंत्रित केले होते. सकाळी शास्त्रीजी म्हणाले, ते रात्रभर झोपले नाहीत. ते मला भूतकाळात घेऊन गेले. ते म्हणाले, त्यांनी एक घोषणा दिली आहे 'जय जवान जय किसान' यावर चित्रपट बनवू शकता का? मी त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो, नक्कीच. त्यांचा आशीर्वाद घेऊन माझा मित्र केवलला म्हणालो, मला एक डायरी आणि दोन-चार बॉल पेन आणून दे. मी दिल्लीतून डिलक्स ट्रेनमध्ये बसलो. गाडी फरिदाबादहून निघाली. त्या प्रवासात 'उपकार'ची कथा लिहिली. हे माझ्या नशिबात लिहिले हाेते. मी येथे दिग्दर्शक बनण्यासाठी आलो नव्हतो. ही तर देवाची इच्छा होती. नंतर 'उपकार'चा प्रीमियर झाला. तेव्हा पहिल्यांदाच राष्ट्रपती झाकीर हुसेन राष्ट्रपती भवनातून बाहेर येऊन प्रीमियरमध्ये सहभागी झाले होते.
 

बातम्या आणखी आहेत...