आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराज, टिळक आणि फुले घराण्यानंतर सरदार पटेलांच्या वशंजानी केला भाजपमध्ये प्रवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली भाजपची मेगाभरती थांबायचे नावच घेत नाहीये. इकडे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्व उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केले. तरीदेखील भाजपची मेगाभरती सुरुच आहे. आतापर्यंत भाजपात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले, शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे, लोकमान्य टिळकांच्या वंशज मुक्ता टिळक आणि महात्मा फुलेंच्या वंशजानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता प्रत्यक्षात देशाचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वशंजांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सरदार पटेलांच्या घराण्यातील आमदार अमरिशभाई पटेल यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. "ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिले त्यांच्या वंशजांना भारतीय जनता पार्टी हीच देशसेवेसाठी काम करत असल्याची भावना आहे. अमरिशभाई पटेल यांना भाजपत घेण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ते जरी दुसऱ्या पक्षात होते, तरी त्यांच्याशी चांगले संबंध राहिले आहे. त्यांनी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून राज्याला खऱ्या अर्थाने दुष्काळ मुक्तीचा मार्ग दाखवला आहे." असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते शिरपूर येथील भाजपचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. 

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपल्या दहा हजारांपेक्षा जास्त समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिरपूर मतदार संघ शतप्रतिशत भाजपमय झाली आहे. यावेळी मंत्री जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, खासदार हीना गावित, अमरीश पटेल आदी उपस्थित होते.