आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : ऋषी कपूर 9 महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून न्यूयॉर्कमध्ये आहेत. ते तिथे कॅन्सरवर उपचार घेत होते आत ते काही दिवस तिथेच विश्रांती घेणार आहेत. अशातच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्या हातात पोळी दिसत आहे. हा फोटो त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शार करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'अनुपम खेरच्या घरी लंचसाठी. खूप दिवसांनंतर मला पिठाच्या पोळ्या खाण्याची संधी मिळाली. हे मजेदार जेवण त्याच्या फ्रायडे दद्दूने बनवले आहे.'
At Anupam Kher’s apartment for lunch. Had the correct “aate(flour) ka phulka( Indian bread) after a while. Great food made by his man Friday Daddu pic.twitter.com/rqjo42qFFM
— Rishi Kapoor (@chintskap) July 21, 2019
टीव्ही शोसाठी अनुपम पोहोचले न्यूयॉर्कला...
अनुपम खेर आपल्या टीव्ही शो 'न्यू एम्सटर्डम' च्या शूटिंगसाठी येथे आले आहेत. याचदारमयन त्यांनी आपल्या अपार्टमेंटवर ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू सिंह यांना लंचसाठी आमंत्रण दिले होते. कपलने अनुपम यांच्या घरचे जेवण खूप एन्जॉय केले. अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर या मेजवानीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ''घरी लंचसाठी नीतूजी, ऋषी आणि संतोष हे आल्यामुळे खूप खुश आहे. नीतूजी बरोबर म्हणाल्या की, आम्ही कधीच वैचार नव्हता केला की, आपण न्यूयॉर्कमध्ये अशा पद्धतीने कधी आमच्या घरी भेटू. पण मी नेहमी म्हणतो की, 'कुछ भी हो सकता है' दद्दू त्यांच्यासाठी विशेष जेवण तयार करून खूप खुश आहे.''
अनुपम यांची इंस्टापोस्ट...
ऑगस्टमध्ये परतणार आहेत ऋषी कपूर...
ऋषी कपूर मागच्या सप्टेंबरमध्ये उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. आता ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात परंतु शकतात. काही दिवसांपूर्वी मुंबई मिररला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये स्वतः ऋषी कपूर यांनी ही माहिती दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.