आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Sold R. K Studio Ganesh Utsav Of 70 year old Tradition Will Not Be Celebrate This Year

आर. के. स्टूडियो विकला जाताच मोडली कपूर परिवाराची 70 वर्षे जुनी परंपरा, आता नाही साजरा करणार गणेशोत्सव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कपूर कुटुंबाने गणेशोत्सव साजरा करण्याची आपली 70 वर्षे जुनी परंपरा मोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्समध्ये रणधीर कपूर यांनी सांगितल्यानुसार लिहिले आहे, मागच्यावर्षी सेलिब्रेट झालेला गणेशोत्सव त्यांच्यासाठी शेवटचे सेलिब्रेशन होते. आता ते पुढे ही परंपरा सुरु ठेवणार नाहीत. सुमारे 70 वर्षांपूर्वी राज कपूरने या सेलिब्रेशनची सुरुवात आर. के. स्टूडियोमध्ये झाली होती. जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने लोक बप्पाच्या दर्शनासाठी पोहोचतात. हे मुंबईतील सर्वात उत्तम गणेशोत्सव सेलिब्रेशनपैकी एक होते.  
 

सेलिब्रेशन बंद करण्याचे कारण... 
रिपोर्ट्सनुसार, रणधीरने सेलिब्रेशन बंद करण्याचे कारण सांगितले की, आर. के. स्टूडियो मोडल्यानंतर त्यांच्याकडे तशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दुसरी जागा नाही. त्यामुळे ते त्यांच्या पित्याने सुरु केलेली ही परंपरा बंद करत आहे. रणधीर कपूर म्हणाले, "आम्ही सर्व बप्पावर खूप प्रेम करतो आणि त्यांच्यावर आमचा खूप विश्वासदेखील आहे. पण मला वाटते की, आता आम्ही हे ट्रेडिशन पुढे घेऊ जाऊ शकत नाही."
 

याच महिन्यात मोडला गेला स्टूडियो... 
हिंदी सिनेमामध्ये शो मॅनच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजकपूर यांनी 1948 मध्ये आर. के. फिल्म्स अँड स्टूडियोजची स्थापना केली होती. तिथे 'आवारा', 'श्री 420', 'मेरा नाम जोकर' आणि 'राम तेरी गंगा मैली' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. 2017 मध्ये आग लागल्यामुळे स्टुडिओचा मोठा भाग जळाला होता. 2018 मध्ये कपूर कुटुंबाने ते विकण्याची घोषणा केली. रिअल एस्टेटचे दिग्गज गोदरेज प्रॉपर्टीजने हे खरेदी करून यांच्याजागी लग्झरी फ्लॅट्स आणि रिटेल स्पेस बनवण्याची तयारी सुरु केली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला स्टूडियोला जमीनदोस्त केले गेले.  

बातम्या आणखी आहेत...