आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manikarnika Again In Controversies: After Sonu Sood One Actress Left Kangana Ranaut Film In Midway

पुन्हा वादात अडकला कंगना रनोटचा 'मणिकर्णिका', सोनू सूदनंतर आता या अभिनेत्रीने अर्ध्यातच सोडला सिनेमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. कंगना रनोटचा 'मणिकर्णिका' चित्रपट रिलीज पुर्वीच वादात अडकलेला आहे. चित्रपटात सेकेंड लीड रोल प्ले करत असलेला अभिनेता सोनी सूदने मध्येच चित्रपट सोडला होता. आता अभिनेत्री स्वाती सेमवालही चित्रपटातून बाहेर झाली आहे. स्वाती म्हणते की, "मी सिनेमा सोडला आहे, पहिले मी निश्चित नव्हते. मी दुविधा मनस्थितीत होते. परंतु काही दिवसांपुर्वी टीमसोबत मीडिंग केली आणि मी फिल्म सोडण्याचा निर्णय घेतला. कारण मला वाटते की, माझ्या करिअरच्या या स्थितीमध्ये मी हे पात्र साकारणे योग्य नाही." सोनू या चित्रपटात सोनू म्हणजेच, मराठा कमांडर सदाशिवराव भाऊची पत्नी पार्वतीची भूमिका साराकत होती. आता सदाशिवरावर भाऊची भूमिका जीशान अयूब साकारत आहेत. परंतु स्वातीची जागा कोण घेणार हे अजुन ठरलेले नाही. 

 

सोनूने सोडला होता चित्रपट 
चित्रपटात सेकंड लीड रोल प्ले करणारा अॅक्टर सोनू सूदने मध्येच चित्रपट सोडला होता. कंगनाने स्पष्टीकरण दिले होते की, सोनू जवळ वेळ नाही आणि त्याला महिला डायरेक्टरच्या अंडरमध्ये काम करण्याची इच्छा नाही. कंगनाच्या आरोपानंतर आता सोनूने तिला उत्तर दिले आहे. शनिवारी सोनू म्हणाला की, "कंगना सतत वुमन कार्ड खेळतेय."


सोनू सूद म्हणाला होता की, "मी डायरेक्टरच्या जेंडरमुळे चित्रपट सोडलेला नाही. कंगना माझी चांगली मैत्रिण आहे आणि पुढेही राहिल. परंतू ती सतत वुमन कार्ड खेळतेय. जर मला जेंडरविषयी काही प्रॉब्लम असतात तर मी 'हॅपी न्यू ईयर'मध्ये फराह खानसोबत काम का केले असते. फराह आणि माझी खुप चांगली प्रोफेशनल इक्वेशन आहे आणि आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. मला ऐवढेच म्हणायचे आहे."

 

काय बोलली होती कंगना रनोट 
सोनूने चित्रपट सोडल्यानंतर फिल्म डायरेक्टर आणि लीड अॅक्ट्रेस कंगना म्हणाली होती की, सोनू जवळ वेळ नाही. कंगनानुसार, "आम्ही ब-याच दिवसांपासून भेटलेलो नाही. सोनू 'सिम्बा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोनू आम्हाला वेळच देत नाहीये. यामुळे आम्ही सोनूला रिप्लेस केले आहे. खरेतर त्याला एका महिला डायरेक्टरच्या अंडरमध्ये काम करण्याची इच्छा नाही. पुर्ण टीमला माझ्यावर विश्वास आहे, परंतू सोनूला माझ्यावर विश्वास नाही."

 

कंगना भूमिकेमध्ये देत होती दखल 
सोनू सूद काही तरी वेगळेच सांगत होता, त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, "यापुर्वी सोनूने 'हॅप्पी न्यू ईयर'च्या वेळी फीमेल डायरेक्टर फराह खानसोबत काम केले होते. 'मणिकर्णिका' चित्रपट सोडण्यामागे मेल ईगो हे कारण नव्हते. सोनू नाराज होता कारण, रायटिंगची जबाबदारी घेतल्यानंतर कंगना मनमानी करत होती. प्रत्येकाचे पात्र काटत होती. यासोबतच लास्ट मोमेंटला डेट्स अॅडजस्ट करण्यास सांगत होती. परंतू सोनूने त्याच्या डेट्स 'सिम्बा'ला दिल्या होत्या. 'सिम्बा'मध्ये सोनूचा लूक दाढीमध्ये होता. तर 'मणिकर्णिका'साठी त्याला क्लीन शेव करावी लागणार होती."

बातम्या आणखी आहेत...