आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - रेल्वे मंत्रालयाने तेजस रेल्वेनंतर आणखी 150 रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याची तयारी सुरु केली आहे. सचिव स्तरावरील सशक्त गटाला हे काम सोपवण्यात आले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यातील बैठकीनंतर रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही के यादव यांना एक पत्र लिहिले. या पत्रानुसार पहिल्या टप्प्यात 150 गाड्या चालविण्याचे काम खासगी ऑपरेटरला देण्यात येणार आहे.
'तेजस एक्सप्रेस' देशातील पहिली खासगी रेल्वे आहे. 'तेजस'ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे जर ठराविक वेळेत पोहोचवत नसेल तर प्रवाशांना याची भरपाई देण्यात येणार आहे. याबाबत आयआरसीटीसीने दिल्ली-लखनऊ दरम्यान धावणाऱ्या ‘तेजस एक्स्प्रेस’ या खासगी ट्रेनविषयी आधीच घोषणा केली आहे. या नियमांतर्गत रेल्वेला एका तासापेक्षा अधिक विलंब झाला तर प्रवाशांना 100 रुपये आणि दोन तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास 250 रुपये भरपाई देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर तेजस कडून प्रवाशांना 25 लाख रुपयांचा विमा देखील देण्यात येणार आहे. याशिवाय प्रवासादरम्यान लुटमार किंवा सामान चोरी झाल्यास भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.