आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटनेनंतर गल्लीतील एका कुत्र्याचे बदलले नशीब, अमेरिकन दांपत्याने घेतले दत्तक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्रांगध्रा/सुरेंद्रनगर : गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगध्रामध्ये एका वर्षपूर्वी झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेला एक कुत्रा आता शिकागो (अमेरिका) ला पोहोचला आहे. अपघातानंतर त्याला केवळ नवीन आयुष्यच मिळाले नाही तर नवा देश आणि नवी ओळखदेखील मिळाली आहे. शिकागो निवासी दांपत्य एंडू आणि हेबोराह पार्करने दत्तक घेतल्यानंतर त्याला फीरिया नाव दिले आहे. सुमारे एका वर्षांपूर्वी श्वान ध्रांगध्राच्या गल्लीमध्ये फिरायचा. तेव्हा तो कोणत्यातरी वाहनापुढे येऊन जखमी झाला होता. त्याचे पुढचे दोन्ही पाय कापले गेले. तेव्हा जखमी अवस्थेत असलेल्या त्या कुत्र्याला बँक कर्मचारी आशीष ठक्कर आपल्या घरी घेऊन गेले आणि त्याच्यावर उपचार केले. जेव्हा त्याच्या जीवावर बेतू लागले तेव्हा अहमदाबादमध्ये ऑपरेशन केले. या सर्वनासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च केले गेले. 


त्यानंतर कुत्रा पूर्णपणे स्वस्थ झाला. त्याची काळजी गेहत असताना आशीषने त्याचे फोटो इंटरनेटवर टाकले. यासोबत सर्व माहितीदेखील लिहिली. हे सर्व पाहून पॉर्कर दांपत्याने अपंग कुत्र्याला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. बराचवेळ संवाद साधल्यानंतर आणि गरजेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आशीष ठक्कर कुत्र्याला दिल्ली एअरपोर्टपर्यंत घेऊन आला. येथून पार्कर दांपत्य त्याला आपल्यासोबत घेऊन गेले. शिकागोला घेऊन जाण्याचा खर्चदेखील पार्कर दाम्पत्यानेच केला. 

चांगल्या कामाचे समाधान आहे : आशीष... 


आशीष म्हणाला, ‘‘एक चांगले काम केल्याचे समाधान आहे. जेव्हा हा जखमी अवस्थेत मिळाला होता, तेव्हाच दृढ़ निश्चय केला होता की, याच्या उपचारासाठी जे करावे लागेल ते करेन. आता तो त्यांच्या शिकागोच्या बंगल्याच्या लॉनमध्ये खेळतो. ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.  

फीरियाची आधुनिक व्हीलचेअरदेखील बनत आहे... 


पार्कर दांपत्याने सांगितले की, आम्ही फीरियासाठी एक आधुनिक व्हीलचेअर बनवत आहोत. जेणेकरून त्याला सहज लॉनमध्ये फिरता यावे. पशु तज्ञांच्या मदतीने कृत्रिम पाय बनवण्यासह इतर उपचार शक्य असेल तर तेदेखील करू जेणेकरून त्याला रामाने आपले आयुष्य घालवता येईल. 

बातम्या आणखी आहेत...