आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Action, MP Varma Said, Kejriwal Terrorist; Orders To Remove Anurag Of The Commission, Varma From The List Of Star Preachers

कारवाईनंतरही खासदार वर्मा म्हणाले, केजरीवाल अतिरेकी; आयोगाचे अनुराग, वर्मांना स्टार प्रचारकांच्या यादीतून काढण्याचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्लीत निवडणूक आयोगाने आक्षेपार्ह वक्तव्ये प्रकरणात भाजपच्या नेत्यांवर कारवाई सुरू केली. त्यानंतरही खासदार प्रवेश शर्मा यांनी बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. एका जाहीर सभेत वर्मा म्हणाले, नक्षली, दहशतवादी सरकारी संपत्तीचे नुकसान करतात. त्याप्रमाणेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही काम केले आहे. अनेक नटवरलाल व केजरीवाल यांच्यासारखे दहशतवादी दिल्लीत दडून बसले आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढायचे की दिल्लीत अतिरेकी केजरीवाल यांच्याशी लढायचे हे कळायला मार्ग नाही. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने भाजपला निर्देश दिले. प्रवेश वर्मा व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीवरून हटवण्यात यावे, असे आयोगाने स्पष्ट केले. ३० जानेवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जबाब मागवला आहे. शाहीन बाग येथे लाखो लोक जमले आहेत. हे लोक घरात घुसून अत्याचार करतील, असे वक्तव्य वर्मा यांनी केले होते. या वेळी निवडणुकीत भारत-पाकिस्तान सामना होईल, असे अनुराग यांनी म्हटले होते. वर्मा यांनी बुधवारी ट्विट करून मला फोन करून धमकी मिळाल्याचा दावा केला.

तक्रार : आपची आयोगाकडे मागणी-शहा यांना प्रचारासाठी बंदी लावावी

आम आदमी पार्टीने गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. शहा यांनी आपल्या खासदारांसह दिल्लीतील शालेय मुले, त्यांचे पालक व शिक्षकांचा एक बनावट व्हिडिआे जारी करून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे शहा यांना प्रचारासाठी ४८ तासांची बंदी घालण्यात यावी, असे आपने म्हटले आहे.

स्टार प्रचारक : यादीतून काढल्यावर उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट

निवडणूक आयोगाने भलेही प्रवेश शर्मा व अनुराग ठाकूर यांना भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचे आदेश दिले असतील. परंतु दोन्ही नेते अद्यापही निवडणूक प्रचार करू शकतात. त्यांचा प्रचारावरील खर्च मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट होणार आहे. याआधी तो खर्च पक्षाच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होत होता.

पाच वर्षे कष्ट घेतले, बदल्यात भाजपने अतिरेकी संबोधले : केजरीवाल

वर्मा यांच्या वक्तव्यावर केजरीवाल यांनी ट्विट केले. ते म्हणाले, पाच वर्षे दिल्लीसाठी दिवस-रात्र कष्ट घेतले. दिल्लीच्या लाेकांसाठी सर्व गोष्टींचा त्याग केला. राजकारणात येण्यापूर्वी अतिशय कठीण परिस्थितीचा मुकाबला केला. लोकांचे जीवनमान सुधारण्याचा माझा उद्देश होता. त्याबदल्यात भाजपने मला दहशतवादी संबोधले. त्याचे खूप दु:ख झाले.

स्वच्छता : केजरीवाल यांनी यमुनेत शर्ट बुडवून वास्तव बघावे : शहा

गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिल्लीच्या नजफगडमध्ये जाहीर सभा घेतली. त्यात ते म्हणाले, आम आदमी पार्टीने यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मी मुख्यमंत्री केजरीवाल यांना आव्हान देतो. त्यांनी आपला शर्ट नदीत बुडवून बघावा. त्यांना पाण्याची खरी स्थिती कळेल. प्रदूषणासाठी केजरीवाल जबाबदार आहेत.

आयोग : जाती-समुदायावर वक्तव्य करू नये : निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने दिल्लीत निवडणुकीत उतरलेल्या सर्व पक्षांना पत्र पाठवून आचारसंहितेचे पालनााच्या सूचना दिल्या. प्रचारादरम्यान नेत्यांनी जाती-समुदायाच्या भावनांना धक्का पोहोचवणारे वक्तव्य करता कामा नये. कुणाच्याही खासगी जीवनाबद्दल बोलू नये. प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर करू नये. महिलांचा सन्मान राखावा.
 

बातम्या आणखी आहेत...