आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निकालानंतर जनताच ईडीला येडे करेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर : देशात आज भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्याची ईडीकडून चौकशी लावण्यात येत आहे. परंतु आम्ही ईडीला घाबरत नाही. विधानसभेच्या निकालानंतर जनताच या ईडीला येडे केल्याशिवाय सोडणार नाही,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ शहरातील शिवाजी चौकात पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या मध्ये ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मी देशाचा कृषिमंत्री असताना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली होती. देशात प्रथमच महाराष्ट्रात ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या आसलेल्या इतर मागासवर्गीयांना व महिलांना ग्रामपंचायतीपासून ते महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये आरक्षण दिले. सत्तेच्या प्रवाहात आणले, अनेक शेतकरी हिताचे व उद्योगधंदे वाढीचे निर्णय घेतले. मात्र पाच वर्षांपूर्वी कधी नावही माहिती नसलेले अमित शहा म्हणतात शरद पवारांनी काय केले.

'मी देशात अनेक पैलवान तयार केलेत'
शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच हेलिकॉप्टरने पंढरपूरच्या सभेला गेले.

दिल्लीसोबत कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे
पवार म्हणाले, युती सरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र आम्ही सदैव शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. सध्याचे सरकार असंवेदनशील असल्यामुळे पाच वर्षात अनेक कारखाने बंद पडले. निम्म्याहून अधिक आजारी पडले. पाच वर्षांत सत्तेचा गैरवापर यांनी केला आहे. शासकीय यंत्रणा हाताशी धरून राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरही धाडी टाकण्याचे काम यांनी केले आहे. दिल्लीसोबत कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही ते म्हणाले.

साताऱ्यातील चूक मतदार २१ तारखेला सुधारणार
सातारा : 'लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना माझ्याकडून चूक झाली होती, हे मी जाहीरपणे कबूल करतो. ती चूक दुरुस्त करण्यासाठी अाज साताऱ्यातील तरुण, वडिलधारी माणसे २१ तारखेची वाट पाहत आहेत. २१ तारखेला तुमचा निकाल संपूर्ण देशाला सांगणार आहे की, सातारा जिल्हा शब्दाचा पक्का, खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा इतिहास जतन करणारा आहे. तो इतिहास तुम्ही घडवाल,' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भरपावसात झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला.