आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The CAA, Now The Identity Of The True Allies, Jaishankar Has Targeted Iran And UNHRC.

सीएए आल्यानंतर आता खऱ्या मित्रराष्ट्रांची ओळख, जयशंकर यांनी इराण व यूएनएचआरसीवर साधला निशाणा

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शनिवारी दिल्लीत आयोजित ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांना नागरिकत्व कायदा दुरुस्ती व दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भारत जुने मित्र गमावत आहे, अनेक देश टीका करू लागले आहेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला. जयशंकर म्हणाले, आता कुठे भारताला आपल्या खऱ्या मित्रांची आेळख पटू लागली आहे.वेगवेगळे लोक नागरिकत्वाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. मानवी हक्क आयोगाने याबद्दलची इतिहासातील माहिती काढून पाहिली पाहिजे. ते सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या मुद्द्याकडे कानाडोळा करू लागले आहेत. जणू त्यांना आमच्या शेजारी देशाशी काहीही देणे-घेणे नाही.  वास्तविक सर्वांचेच स्वागत करणारा एखादा तरी देश जगाच्या पाठीवर आहे का? भारत सरकारने अशा लोकांची देशातील संख्या कमी करण्यासाठी कायदा तयार केला. ही गोष्टी अभिनंदनास पात्र ठरते, असे मत एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, दिल्ली हिंसाचारावरून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी ट्विट करून भारतातील मुस्लिमांच्या नरसंहारामुळे जगभरातील मुस्लिम दु:खी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर भारत सरकारने कट्टर हिंदुत्ववादी व संघटनांना रोखले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले होते. दिल्ली हिंसाचार : पोलिस चौकशी करताहेत, ताहिरचे पिस्तूल, मोबाइल जप्त; फॉरेन्सिकला पाठवले
 


ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात सामील असल्याप्रकरणात निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनची दिल्ली पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांनी हुसेनचे पिस्तूल अनेक काडतूसे व मोबाइल जप्त केले आहेत. पिस्तुलाने गोळीबार केला किंवा नाही याच्या तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहे. मोबाइल डेटाचाही तपास केला जात आहे. आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा ठपका त्याच्यावर आहे. हत्येच्या आणखी एका प्रकरणात आरोपीस अटक


पूर्व दिल्लीच्या ब्रह्मपुरीत मिठाई दुकानात काम करणारे दिलबर सिंह नेगीच्या हत्या प्रकरणातील २७ वर्षीय आरोपी शाहनवाजला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस इतर आरोपींची आेळख पटवत आहेत. उत्तराखंडच्या नेगी यांचे पार्थिव २६ फेब्रुवारीला आढळून आले होते. त्यांचे हातपाय कापून मृतदेहाला जाळले होते. 
 पीएफआयप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती


सर्वोच्च न्यायालयाने पीएफआयच्या २२ कार्यकर्त्यांना जामीन देण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. पीएफआयच्या या कार्यकर्त्यांना गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी मंगळुरूमध्ये सीएएच्या विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार व पोलिसांवर हल्ला केल्याचा आराेप आहे. 

बातम्या आणखी आहेत...