आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The 'cancellation', The Pace Of Development In Kashmir Came To An End; Starting 3 Schemes With Janadhan, Target Of 5% In 5 Days

‘३७० रद्द’नंतर काश्मीरमध्ये विकास प्रक्रियेला आला वेग; जनधनसह ८५ योजना सुरू, ३० दिवसांत १००%चे लक्ष्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीर सचिवालयावर फक्त तिरंगा - Divya Marathi
काश्मीर सचिवालयावर फक्त तिरंगा

श्रीनगर/ नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर विसाव्या दिवशी केंद्र सरकारने येथे विकासाच्या प्रक्रियेला वेग दिला. रविवारी राज्यात केंद्र सरकारच्या ८५ योजना सुरू करण्यात आल्या. २१ मंत्रालयांच्या अंतर्गत येणाऱ्या या योजनांची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपर्यंत प्रदेशात १०० टक्के करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या योजनांत अटल पेन्शन, पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजना, जनधन, स्टँड अप इंडिया, प्रत्येक घराला वीज इत्यादी योजनांचा समावेश आहे. याशिवाय एलपीजी जोडणी तसेच रॉकेल व एलपीजीच्या प्रत्यक्ष सबसिडीचा लाभ येथील रेशन कार्डधारकांना दिला जाईल.

अल्पसंख्याक मंत्रालयाचे पथक काश्मीरला जाणार : अल्पसंख्याक मंत्रालयाचे पथक लवकरच काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे. केंद्रीय योजना लागू करण्यासाठी हे पथक आढावा घेईल. अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली. हे मोदी सरकार आहे, ३७०च्या निर्णयावर कोणत्याही स्थितीत फेरविचार होणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.
 
औषधांचा तुटवडा नाही : प्रशासनाचा दावा
जम्मू-काश्मीर प्रशासनाने राज्यात औषधांचा तुटवडा असल्याच्या बातम्यांचे खंडन केले. अजूनही राज्यात सर्व प्रकारची १५ ते २० दिवस पुरतील एवढी औषधे शिल्लक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. औषधांचे प्रमुख वितरक प्रामुख्याने जम्मूत आहेत. त्यांना ऑर्डर दिल्यानंतर १४-१८ तासांत औषधे काश्मीरमध्ये कुठेही पोहोचू शकतात, असा प्रशासनाचा दावा आहे.
 
 
पद्मभूषण ज्युलिओ रिबेरोंचा आक्षेप
पद्मभूषणने सन्मानित माजी पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी कलम-३७० रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. असे निर्णय घेतले जात असताना लोकांची इच्छा जाणून घेणे महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले. १९८० च्या दशकात पंजाबमधील दहशतवाद निपटून काढण्यात रिबेरो यांची प्रमुख भूमिका होती.
 
 

बातम्या आणखी आहेत...