आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Cancellation Of The India New Zealand Match, Amitabh's Joke 'shift The World Cup Matches In India, We Need Rain'

भारत-न्यूजीलँडची मॅच रद्द झाल्यानंतर अमिताभ यांचा जोक - 'वर्ल्डकप इंडियामध्ये शिफ्ट करून टाका' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असतात आणि ते खूप मजेदार स्टाईलमध्ये आपले मत मांडतात. क्रिकेटचे जबरदस्त फॅन असल्यामुळे ते इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्डकप 2019 ला फॉलो करत आहेत. हेच कारण आहे की, जेव्हा गुरुवारी भारत और न्यूजीलँड यांच्यामध्ये असलेली मॅच पावसामुळे रद्द झाली तर त्यांनी ट्वीटद्वारे एक मजेदार रिएक्शन दिली आहे. एका क्रिकेट फॅनने मॅच रद्द झाल्यामुळे आयसीसीवर निशाणा साधला तर बिग बींनी फनी स्टाईलमध्ये लिहिले, "वर्ल्डकप 2019 टूर्नामेंट भारतात शिफ्ट करा...आम्हाला पावसाची गरज आहे." 

 

 

आतापर्यंत तीन मॅच झाले आहेत रद्द... 
भारत और न्यूजीलँड यांच्यातील मॅचपूर्वी पावसामुळे वर्ल्डकपचे आतापर्यंत तीन मॅच रद्द झाले आहेत. 7 जूनला पाकिस्तान आणि श्रीलंकाची मॅच होऊ शकली नाही तर 11 जूनला बांग्लादेश-श्रीलंकाची मॅच पावसामुळे झाली नाही. भारतभारताची पुढची मॅच पाकिस्तानसोबत आहे जी 16 जूनला मेनचेस्टरमध्ये होणार आहे.