आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर काही जणांनी ते राहत असलेल्या रामायण बंगल्यासमोर गुरुवारी  दुपारी बारा वाजता फटाके फोडले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
या प्रकरणी पोलिस कर्मचारी रवींद्र सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस नाईक गुंबाडे ‘पीटर मोबाइल’ने सहायक निरीक्षक विलास शेळके यांच्यासोबत गस्त करत असताना ‘रामायण’समोर फटाके फोडण्याचा आवाज आला.

 

पोलिसांनी वाहनातून उतरून शोध घेतला. मात्र, तोपर्यंत फटाके फोडणाऱ्यांनी तेथून पळ काढला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत फटाके फोडण्यास बंदी असताना फटाके फाेडल्याबद्दल अनोळखी व्यक्तींविरोधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू  केला आहे.

बातम्या आणखी आहेत...