आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Death Of Veeru Devgn, PM Modi Wrote A Letter, Ajay Said, "Thank You ...."

वीरू देवगण यांच्य निधनानंतर पीएम मोदी यांनी पत्र लिहून व्यक्त केले दुःख, अजय म्हणाला - 'धन्यवाद....'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : काही दिवसांपूर्वी अजय देवगणचे पिता आणि हिंदी चित्रपटातील अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनीं या जगाचा निरोप घेतला. वीरू देवगण यांच्या निधनानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. पीएम यांनी अजयबाईच्या नावाने एक पत्र लिहिले आणि आपली संवेदना व्यक्त केली.  

 

अजयने पीएम मोदी यांचे हे पत्र आपल्या ट्विटरवर शेअर केले आणि पूर्ण देवगण कुटुंबियांच्या वतीने आभार मानले. मोदींनी हे पत्र वीरू यांच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर म्हणजेच 28 मेला लिहिले आहे. यामध्ये पीएम यांनी लिहिले, 'हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या शानदार कामगिरीसाठी ओळखले जाणारे श्री वीरू देवगण यांच्या निधनामुळे खूप दुखी आहे. हे इंडस्ट्रीसाठी मोठे नुकसान आहे. त्यांनी स्टंटमन, अॅक्शन कोरियोग्राफर, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर म्हणून काम केले आणि हे सिद्ध केले की, जे काम त्यांनी निवडले त्यासाठी स्वतःला समर्पित करून त्यांनी नवे मार्ग बनवले.'

 

 

85 वर्षांचे होते वीरू देवगण... 
वीरू देवगण यांचे निधन 27 मेला झाले. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीच्या अनेक मित्रांनी देवगण कुटुंबाचे सांत्वन केले. वीरू देवगण 85 वर्षांचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर त्यांना कार्डियाक अरेस्ट आला आणि त्यांचे निधन झाले. 

 

सर्वात जुने स्टंटमन होते वीरू... 
वीरूजी बॉलिवूडमधील सर्वात जुने अॅक्शन डायरेक्टर्स आणि स्टंटमनपैकी एक होते. त्यांनी 'सत्ते पे सत्ता', 'स्वर्ग से सुंदर', 'दस नंबरी', 'मिस्टर नटवरलाल', 'क्रांती', 'राम तेरी गंगा मैली', 'आखिरी रास्ता', 'मिस्टर इंडिया', 'फूल और कांटे', 'इश्क' यांसारख्या 80 पेक्षा जास्त चित्रपटात अॅक्शन कोरियोग्राफर म्हणून काम केले. 1999 मध्ये त्यांनी डायरेक्टर-प्रोड्यूसर म्हणून 'हिंदुस्तान की कसम' हा चित्रपट बनवला होता.
 

बातम्या आणखी आहेत...