आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Defeat In The Election, The Candidate Demanded The Items Distributed In The Village; People Returns Cookers, Mixers, Clothes

निवडणुकीतील पराभवानंतर उमेदवाराने ग्रामस्थांना दिलेल्या वस्तू मागितल्या परत; लोकांनी कुकर, मिक्सर, कपड्यांचा ढीग रचला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : रायपूरजवळ भानसोज गावातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतरची रंजक घटना
  • आरोपी उमेदवार फरार, बेवारस वस्तू पोलिसांनी केल्या जप्त

​​​​​रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरजवळील भानसोज परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक रंजक घटना उघडकीस आली. बुधवारी सकाळी नागरिकांनी गावातील बस स्थानकाजवळील चौकात कुकर, मिक्सर, पँट-शर्टसह दारूच्या बाटल्या आणून ठेवल्या. चौकात पडलेल्या या वस्तू पाहून चांगलाच गोंधळ उडाला. याबद्दल कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार मनोहर देवांगन यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुकर, मिक्सर अशा वस्तूंचे वाटप केले होते, असे उघड झाले. मात्र पराभवानंतर मनोहरने ग्रामस्थांकडून दिलेल्या वस्तू परत मागितल्या. तसेच ज्या वस्तू घेतल्या आहेत, त्या परत करा अशी धमकी गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थ त्याच्या वर्तणुकीमुळे नाराज झाले. काही वेळानंतर ग्रामस्थांनी एक-एक करून सर्व वस्तू बस स्थानकाजवळील चौकात आणायला सुरुवात केली. अल्पावधीतच तेथे वस्तूंचा ढीग जमा झाला. ग्रामस्थांनी उचललेल्या पावलामुळे मनोहरने पळ काढला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून वस्तू जप्त केल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रहास व मनोहर देवांगन हे दोन्ही भाऊ सदस्यपदाचे उमेदवार होते. मात्र मनोहरचा पराभव झाला. बुधवारी मनोहरने मतदान करण्यासाठी मी तुम्हाला वस्तू दिल्या होत्या. तरीही तुम्ही मला मत दिले नाही', असे म्हणत वस्तू परत करण्यास सांगितल्याचे उषा म्हणाल्या. यानंतर गावकऱ्यांनी उमेदवाराने दिलेल्या या वस्तूचा ढीग रचला.

निवडणूक आयुक्त म्हणाले, हे तर आमिष, गुन्हा दाखल

छत्तीसगडचे निवडणूक आयुक्त ठाकूरराम सिंह यांनी सांगितले की, हे प्रकरण आदर्श आचारसंहितेनुसार मतदारांना आमिष दाखवण्याचे आहे. याची चौकशी होईल. दुसरीकडे आरंगचे टी.आय. लेखधर दिवाण म्हणाले, ग्रामस्थांनी मनोहर देवांगन व त्याच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही भावांवर मारहाण, शिवीगाळ आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...