घरी परतण्यास उशीर / घरी परतण्यास उशीर झाल्याने सासऱ्याची सुनेला मारहाण; सासऱ्याचे कृत्य पतीला सांगिल्याने त्याने पेटवले 

Feb 01,2019 08:15:00 AM IST

नाशिक- आजारी असल्याने विवाहिता आपल्या पतीसोबत इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे डॉक्टरडे गेली असता दोघांना घरी परतण्यास उशीर झाला. उशीर झाल्याने सासऱ्याने दोघांनाही शिवीगाळ करत सुनेच्या कानशिलात लगावली. या वेळी विवाहितेने तुमच्या वडिलांनी मला अंगणात का मारले म्हणून पतीला जाब विचारला. त्यावर संतापलेल्या पतीने पत्नीलाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना टाकळी येथे घडली. या घटनेत विवाहिता ४० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिना सिद्धार्थ औटे या आजारी असल्याने त्या त्यांचे पती सिध्दार्थ मिलिंद औटे यांच्यासोबत औषधोपचारासाठी इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे मंगळवारी (ता.२९) रोजी गेले होते.


सांयकाळी सहा वाजता ते दोघेही घरी परत आले, तेव्हा सासरे मिलींद नारायण औटे यांनी घरी येण्यास एवढा उशीर का झाला म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच या वेळी फिर्यादी सून हिना यांच्या कानशिलात लगावली. अंगणात मारल्याचा राग आल्याने तिने पती सिध्दार्थ याला जाब विचारला. त्यावेळी सिध्दार्थने मी तुला वैतागलो आहे सांगत राँकेलची कॅन हिनाच्या अंगावर ओतून तिला पेटवले. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

X