आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी वाद, दुपारी परीक्षा दिल्यानंतर डोक्यात मारून केला मित्राचा केला खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई -   दहावीतील दोन विद्यार्थ्यांत सकाळी   वाद झाला. दुपारी परीक्षा आटोपून दोघे  वसतिगृहात आले तेव्हा  एकाने  दुसऱ्या मित्राच्या डोक्यात जड वस्तू मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई येथील  नागझरी परिसरातील अमृतेश्वर नगरात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली.   दत्ता अशोक हजारे (१५, रा. पोळ पिंपरी, ता. परळी) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.     


परळी तालुक्यातील पोळ पिंपरी येथील अशोक हजारे यांचा मुलगा दत्ता  हा बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथील रेणुका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता.   तो   राजमाता गुरुकुल या खासगी वसतिगृहात  राहत होता.   या वसतिगृहात  मंगळवारी सकाळी दत्ता आणि त्याच्या मित्रात  वाद झाला. त्यानंतर दोघेही शाळेत  परीक्षेला गेले.  परीक्षा आटोपून वसतिगृहात परतले.  दत्ता  वसतिगृहाच्या छतावर अभ्यास करत असताना दुपारी  साडेतीन वाजता  दुसऱ्या विद्यार्थ्याने दत्ताच्या  डोक्यात  जड वस्तू मारली. त्यात तो जागीच गतप्राण झाला.

 

बातम्या आणखी आहेत...