nashik / गाेदावरीचा पूर ओसरल्यानंतर उसळला आता खरेदीचा महापूर

सेल : १७ दिवसानंतर पावसाची विश्रांती, खरेदीसाठी नागरिकांनी केली गर्दी 

प्रतिनिधी

Aug 12,2019 11:03:00 AM IST

नाशिक : शहरात २६ जुलैपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने रविवारी (दि. ११) विश्रांती घेतली. पावसाने उघडीप दिल्याने तसेच गंगापूर धरणातून विसर्गदेखील कमी करण्यात अाल्याने गाेदावरीचा पूर अाेसरला. मात्र भांडीबाजार, दहिपूल परिसरातील दुकानदारांनी लावलेल्या सेलमध्ये खरेदीसाठी नागरिकांचा महापूर लाेटल्याची परिस्थिती निर्माण झाली हाेती. पावसाने रविवारी उघडीप दिल्याने व्यावसायिकांनी लावलेल्या सेलमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी अशी गर्दी केली.

दुष्काळाचा चटका सहन करावा लागल्याने पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली हाेती. जुन महिनाही काेरडा गेल्याने नागरिकांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली हाेती. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली.पाणलाेट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे गंगापूर धरण ९० टक्क्यांपर्यंत पाेहचल्याने धरणातून माेठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत हाेता.याचमुळे ४ अाॅगस्ट राेजी गाेदावरी नदीला महापूराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली हाेती.धरणातील विसर्ग कायम असल्याने गाेदावरीनदीची पुरस्थिती गेल्या ८ अाठ दिवसांपासून कायम असल्याने गाेदाकाठ परिसरातील छाेटे-माेठे मंदिरे पाण्याखालीच हाेती. दरम्यान रविवारी सकाळपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे गाेदावरीला पूर अाेसरला असून दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी पाेहाेचले हाेते. यामुळे पाण्याखाली असलेल्या मंदिराचे दर्शन अाठ दिवसानंतर भाविकांना घडले. अशी परिस्थिती असतांना दुसरीकडे मात्र भांडीबाजार, सराफबाजारासह दहिपूल परिसरातील नुकसान झालेल्या दुकानदारांनी विविध वस्तूचा सेल लावल्याने खरेदीसाठी माेठी गर्दी केली हाेती. खरेदीच्या या गर्दीच्या महापूरामुळे या ठिकाणांहून पायी चालणेही खूप अवघड बनले हाेते.

दहिपूल, भांडीबाजारात पायी चालणे कठीण
सुट्टीचा दिवस साधत नागरिक खरेदीसाठी पडले बाहेर
शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हाेते. मात्र, रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने तसेच तब्बल १७ दिवसानंतर सूर्यदर्शन घडल्याने नागरिकांनी सुट्टीचा दिवस साधत खरेदीसाठी माेठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले

गाेदाकाठ परिसरात राबवली स्वच्छता माेहीम
पुरामुळे गाेदाकाठ परिसरात माेठ्या प्रमाणावर चिखल तसेच कचऱ्याचे साम्राज्य पसरले अाहे. पुर अाेसरल्यानंतर महापालिका तसेच परिसरातील दुकानदारांच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता माेहीम राबविण्यात अाली.

X
COMMENT