आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्री खोतकरांच्या मध्यस्थीनंतर कृषिकन्यांचे आंदोलन स्थगित; आंदोलन दडपल्याचा ग्रामस्थांचा आरोप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणतांबे/नगर- गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले कृषिकन्यांचे अन्नत्याग आंदोलन दडपण्यासाठी कृषिकन्यांची रक्तातील साखर कमी झाल्याने प्रकृती खालावत असल्याचे कारण देऊन दोन मुलींना शुक्रवारी मध्यरात्री नगर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, पोलिस आणि महसूल विभागाने आंदोलन मोडित काढण्यासाठी बळाचा वापर करून कृषिकन्यांना उचलून नेऊन आंदोलन दडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या निषेधार्थ गाव दुपारपर्यंत बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.

 

दरम्यान, नगर येथे जिल्हा रुग्णालयात आंदोलक मुलींच्या मागण्यांची सरकारने दखल घेतली असून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन कृषिराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मुली पुणतांब्यात परतल्या. 

 

४ फेब्रुवारीपासून येथे किसान क्रांतीच्या किसान जागर यात्रेला पाठिंबा म्हणून निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूजा जाधव या कृषिकन्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. शुभांगीची गुरुवारी मध्यरात्री प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात हलवले होते. पाचव्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी येथे भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, कृषिकन्यांनी ठोस कार्यवाही झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगून पालकमंत्र्यांची‌ विनंती धुडकावली होती.‌ शुक्रवारी मध्यरात्री कृषिकन्यांनी शरीरातील साखर कमी झाल्याचे कारण दाखवत दोन आंदोलनकर्त्या मुलींना उचलून नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, किसान क्रांती समन्वय समितीचे धनंजय जाधव व अन्य कार्यकर्त्यांनी विरोध केला. 

 

बातम्या आणखी आहेत...