आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Invasion Of Aramco, India Can Now Be Imported From Russia, In The Form Of Alternatives To Crude Oil

अरामकोवरील हल्ल्यानंतर भारत आता कच्च्या तेलासाठी अन्य पर्यायांच्या शाेधात, रशियातून आयात करणे शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - साैदी अरबमधील अमराेकाे तेल कंपनीच्या प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर आपली ऊर्जा सुरक्षा अधिक चांगली करण्यासाठी भारत रशियातून कच्चे तेल आयात करण्याचा विचार करत आहे. पेट्राेलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी कच्च्या तेलामुळे बाजारात चिंता वाढणे स्वाभाविक आहे. ही वास्तविकता आपण स्वीकार केली पाहिजे. मंगळवारी सकाळी आपण रशियाचे  माजी उपपंतप्रधान आणि रशियातील सर्वात माेठ्या राेझनेफ्ट तेल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इगाेर इवाेनिच यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले भारत जगाच्या विविध भागातून कच्च्या तेलाची आयात करताे . परंतु रशियातून फार कमी प्रमाणात तेलाची आयात हाेते. मागील वर्षात रशियातून केवळ २,२१९.४ टन तेल आयात झाले.
 

हल्ल्यानंतर दाेन दिवसांनी सोमवार आणि मंगळवारीही मिळाले कच्चे तेल
अमराेकाेवर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर कंपनीच्या उत्पादनात ५७ लाख बॅरलने घट झाली आहे. ही घट जागतिक तेल उत्पादनाच्या तुलनेत पाच टक्के आहे. प्रधान म्हणाले, साैदी अरब हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारात नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताची या परिस्थितीवर नजर आहे. अमराेकाेबराेबरच्या दिर्घ कराराप्रमाणे तेल कंपन्यांना जितके तेल लागते त्यापैकी निम्मे तेल मिळाले आहे. या हल्ल्यानंतर साेमवारी व मंगळवारी देखील भारताला पुरेशा प्रमाणात तेलाचा पुरवठा झाला.
 

एका दिवसाच्या माेठ्या तेजीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत १.१५ % घट
साैदी अमराेकाेवरच्या ड्राेन हल्ल्यानंतर साेमवारी ब्रेंट क्रूडची किंमत १५ टक्क्यांनी वाढली. परंतु मंगळवारी त्यात काही घसरण झाली. बातमी लिहिण्यापर्यंत १.१५ % घसरणीसहं ६६.९० डाॅलर प्रती बॅरलच्या किंमतीवर व्यवहार झाले. साैदी अरबने अमराेकाे लवकरच हल्ल्यामुळे गेलेली उत्पादन क्षमता पुन्हा प्राप्त करेल असे म्हटले आहे. त्यानंतर घसरण झाली आहे. डब्ल्युटीआय क्रूडमध्ये १.३७ % घसरण झाली आहे. हे तेल ६२.०४ डाॅलर प्रती बॅरल या दराने व्यापार हाेत हाेता. साेमवारी क्रूड ची किंमत एकेकाळी  २० टक्क्यांपर्यंत वाढलेली हाेती.  
 

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर देशात पेट्राेल- डिझेलच्या किमतीत किरकाेळ वाढ
साैदी अमराेकाे संकटामुळे भारतात मंगळवारी पेट्राेल- डिझेलच्या दरात किरकाेळ वाढ झाली. पेट्राेलची किंमत प्रती लिटर १८ पैसे तर डिझषल प्रती लिटर ३३ रुपयांनी वाढले. एका लिटर पेट्राेलची किंमत दिल्लीत ७७.२१ रुपये झाली तर मुंबईत ७७.८३ रुपये झाली. एक लिटर डिझेलचा दर दल्लीत ६५.६१ रुपये तर मुंबईत ६८. ७६ रुपये झाला. पेट्राेल डिझेलचे भाव सतत चार दिवस वाढल्यानंतर साेमवारी त्यात बदल झाला नाही. साेमवारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्राेल, इंधनाच्या दरात काेणताही बदल केला नाही