आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफीनंतर आता सावकारी कर्जमाफीचा निर्णय, ६५ कोटींची केली तरतूद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  • सहा कोटी २५ लाखांचा हप्ता सहकारकडे वर्ग

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्यानंतर विरोधकांनी सावकारी कर्जमाफी होणार का, या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर आता सरकारने सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेले कर्जही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने ५ मार्च रोजी जाहीर केला आहे. शासन निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल, तर सरकारकडून त्या संबंधित सावकारास रक्कम अदा करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने केलेल्या सावकारी कर्जमाफीचा शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कर्जमाफी झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. सहा कोटी २५ लाखांचा हप्ता सहकारकडे वर्ग

 सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ होणार आहे. त्यासाठी ६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून ६ कोटी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता सहकार आयुक्त व निबंधक यांना वर्ग करण्यात आला आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने सावकारी कर्ज माफ करण्याचा २०१५ मध्ये प्रथम निर्णय घेतला होता. त्यानुसार आताच्या महाविकास आघाडी सरकारनेही निर्णय घेतला आहे.  विकासाचा मोठा अनुशेष विदर्भ व मराठवाड्यात आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांत सहकारी बँकांचे जाळे कमकुवत आहे. परिणामी या दाेन्ही विभागांत सावकारांकडून कर्जे घेतली जातात.