आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनिया-पवारांच्या भेटीनंतर आज सुटणार सरकारचा तिढा; पुण्यातील बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

पुणे - महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे आघाडी सरकार स्थापन हाेण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत जवळपास सर्वच मुद्द्यांवर एकमत झाले असून आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनच हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साेमवारी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या अध्यक्षा साेनिया गांधींशी अंतिम चर्चा करणार आहेत. या दाेन्ही नेत्यांच्या चर्चेतून सरकार स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय हाेऊ शकताे, असे संकेत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काेअर कमिटीच्या पुण्यात झालेल्या बैठकीतून मिळाले आहेत.

पत्रकारांशी बाेलताना नवाब मलिक म्हणाले, ‘साेमवारी शरद पवार व साेनिया गांधी यांच्यात दिल्लीत बैठक हाेणार आहे. त्यानंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते यांची मुंबईत बैठक हाेऊन त्यात पुढील रणनीतीबाबत चर्चा केली जाईल.’ सूत्रांच्या माहितीनुसार, पवार व साेनिया यांच्या बैठकीत सत्तास्थापनेचा अंतिम फाॅर्म्युला निश्चित हाेणार असून त्यानुसार मंगळवारच्या बैठकीत केवळ औपचारिक चर्चा होईल.शेतकरी हितासाठी मी आघाडीसाेबत : राजू शेट्टी

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची ‘माेदीबागे’त भेट घेतली. किमान समान कार्यक्रमात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवल्यास या सरकारला आमचा पाठिंबा असेल,’ अशी भूमिका आपण पवारांसमाेर मांडल्याचे शेट्टी यांनी सांगितले.सत्तेसाठी फॉर्म्युला ठरलेला नाही : पवार

सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष एकत्र येणार असले तरी या आघाडीतील सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. यासंदर्भात येत असलेल्या सर्व बातम्यात काहीही तथ्य नाही,’ असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी बारामतीत बाेलताना दिले.