आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Premiere Of 'The Sky Is Pink', Priyanka's Tears Come To Her Eyes, Crying With Hugs By Shonali Bose

'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रीमियरनंतर प्रियांकाच्या डोळ्यात आले अश्रू, शोनाली बोस यांना आलिंगन देऊन रडली  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका मोठ्या ब्रेकनंतर 'द स्काय इज पिंक' ने बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटाचे प्रमोशनदेखील जोरदार करत आहे. फॅन्स तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच 'द स्काय इज पिंक' च्या प्रमोशनदरम्यानचा प्रियांकाचा एक व्हिडीओ समोर आहे. 'द स्काय इज पिंक' चा प्रीमियर टोरंटो फिल्म फेस्टिवल (TIFF) मध्ये ठेवला गेला होता. यादरम्यान प्रियांका चोप्रा, अफहान अख्तर आणि सोनाली बोस सह अनेक कलाकारदेखील तिथे पोहोचले होते. चित्रपटाचा प्रीमियर पाहिल्यानंतर तिथे असलेल्या सर्वच लोकांनी चित्रपटाचे कौतुक केले आणि डायरेक्टर सोनाली बोस सह स्टारकास्टने एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.  

यादरम्यान एका सहकलाकाराला आलिंगन दिल्यानंतर प्रियांका चोप्रा रडू लागली. तिच्या रडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. या व्हिडिओबद्दल खूप चर्चाही होत आहे. टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये प्रियांकाने सांगितले की, पहिल्यांना ती एखाद्या हिंदी चित्रपटात प्रोड्यूसर म्हणून काम करत आहे.   

बातम्या आणखी आहेत...