Home | International | Pakistan | After the Pulwama attack, inflation in Pakistan,

पुलवामा हल्ल्यानंतर पाकमध्ये महागाईच्या झळा, चौपट वाढ; डॉलरचा तुटवडा व परदेशी कर्जाचा बोजा

वृत्तसंस्था | Update - Apr 15, 2019, 11:37 AM IST

भारताने पाकिस्तानच्या वस्तूंवर २०० टक्के कर दिला हाेता, त्याचा दिसला परिणाम

 • After the Pulwama attack, inflation in Pakistan,

  इस्लामाबाद - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील महागाईवर पडला असून महागाई चार पटीने वाढली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी १४ फेब्रुवारी पूर्वी पाकिस्तानात महागाईचा दर २.२ टक्के होता. त्याच्या ५८ दिवसांनंतर ९.४ टक्के आहे. महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. खाद्यपदार्थांसह आैषधीही महागली आहे. ते पाहून आैषधी नियंत्रण विभागाने शनिवारी कराची, लाहोर, पेशावरमध्ये २८ आैषधी कंपन्यांवर छाप्यांची कारवाई केली. दोषी कंपन्यांवर गुन्हाही दाखल केला. त्यात ८३ प्रकारच्या आैषधी जप्त करण्यात आल्या आहेत. या कंपन्या आैषधी जादा दराने विक्री करत होत्या. पाकिस्तानच्या माध्यमांनी ही माहिती दिली. पाकिस्तानचे आरोग्य मंत्री आमीर महमूद कियानी म्हणाले, सरकार देशभरात नफेखोरीला आळा घालण्यासाठी कारवाई करत आहे. सरकारने ऑडिटर जनरलला आैषधी नियामकच्या खात्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानात ९० लाख कोटी रुपयांचा आैषध उद्योग आहे.

  सरकारने ऐकले नाही म्हणून संघटनेने स्वत: वस्तूंच्या दरात केली वाढ, ११ लाखांचा दंड

  पाकिस्तानात ५८ दिवसांत खाद्य-पदार्थांच्या किंमती हाताबाहेर जाऊ लागल्या आहेत. ‘डॉन’ च्या मते प्रशासनाने दूधाचे दर प्रतिलिटर ९४ रुपये केले. बहुतांश विक्रेते १२० ते १८० रुपयाने विक्री करतात. सरकारला दर वाढवण्याची मागणी केली होती. पण सरकारनेेे ऐकले नाही, असे डेअरी संघटनेने म्हटले आहे. प्रशासनाने छापे टाकून ११ लाखांचा दंड वसूल केला. टोमॅटोसारख्या भाज्या १५० रुपये किलोने विक्री केल्या जात आहेत. ]

  भारताने पाकिस्तानच्या वस्तूंवर २०० टक्के कर दिला हाेता, त्याचा दिसला परिणाम

  भारताने १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढला होता. पाकच्या वस्तूंवर २०० टक्के कर लावला होता. भारताने पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा १९९६ मध्ये दिला होता. दोन्ही देशांदरम्यान जुलै २०१८ ते जानेवारी २०१९ पर्यंत १.१२२ अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला. पाकने भारतासोबत ८९० दशलक्ष डॉलरची आयात केली होती. साखर, भाजी, कपाशीचा व्यापार होतो.

  महागाई दर ९.४ टक्के, दरवर्षी ६.९७ टक्के वाढ, बँक व्याजदर १०.७५ टक्के

  पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाच्या मते, देशात मार्च महिन्यात महागाई दर ९.४ टक्क्यांवर गेला. जुलैपासून मार्चदरम्यान सरासरी महागाई दर प्रतिवर्षी ६.९७ टक्क्यांनी वाढत राहिला. हे पाहून बँकांच्या व्याजदरात वाढ होऊन ती १०.७५ टक्के झाली. सरकारने गेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक महागाई दर ६ टक्के राखण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये महागाईचे हे उद्दिष्ट राखण्यात सरकार कमी पडल्याचे दिसून आले.

  डॉलरचा तुटवडा व परदेशी कर्जाचा बोजा, फक्त ६ आठवड्यांपुरती परकीय गंगाजळी

  पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत घट झाली आहे. देशाला परदेशी कर्जाचा सामना करावा लागत आहे. कारण कर्जाचा डोंगर खूप मोठा आहे. सध्या पाकिस्तानकडे ८ अब्ज डॉलर आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेचा हा किमान स्तर मानला जातो. त्यामुळेच सहा आठवड्यांच्या आयात व्यवहाराच्या दृष्टीनेच ही रक्कम पुरेल. दिवाळखोरीमुळेच जागतिक बँक, आशियाई बँकेने पाकला कर्ज देण्यास नकार दिला. चीनकडून मात्र मदत मिळते.

Trending