आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकालानंतर आघाडीचे घटक पक्ष वाऱ्यावरच, संपर्कही नाही, समान कार्यक्रमात आमचे मुद्दे असल्यास पाठिंबा : घटक पक्ष

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी महाआघाडीतील घटक पक्षांची मते जाणून घ्यावी लागतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणत आहेत. मात्र, निकाल जाहीर झाल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीने घटक पक्षांशी संपर्क साधला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे घटक पक्षांत तीव्र नाराजी असून किमान समान कार्यक्रमात आमचे प्राधान्याचे मुद्दे असतील तरच 'महाशिवआघाडी'च्या सरकारला पाठिंबा देऊ, अशी भूमिका घटक पक्षांनी घेतली आहे.
आघाडीत नाराजी


छोट्या पक्षांसाठी सोडलेल्या जागी काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार दिले. छोट्या पक्षांचे अनेक उमेदवार पराभूत झाले. या दगाबाजीमुळे छोट्या पक्षांत नाराजी आहे.

सन्मानाने वाटा : काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील पेच सुटला की घटक पक्षांना सन्मानाने सत्तेत वाटा देण्याचे ठरले असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

पवार म्हणाले होते, घटक पक्षांशी बोलू ; घटक पक्ष म्हणतात...
1. स्वाभिमानी : मी शरद पवारांना भेटलो. सरकार बनवायचे तर शेतकरी वीज बिल व कर्जमाफी त्यात असायला हवी. -राजू शेट्टी
2. बहुजन विकास आघाडी : आमचे ३ आमदार आहेत. दिल्लीत खलबते सुरू असताना आमच्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. -हितेंद्र ठाकूर
3. शेकाप : 'आम्ही आघाडीत लढलो. सरकार झाले तरी आघाडीतच राहू. पवार सांगतील ते करू' -प्रा. एस. व्ही. जाधव
4. समाजवादी : अबू आझमी म्हणाले, 'सरकार बनावे ही आमची भूमिका आहे. हिंदुत्व व अल्पसंख्याकांच्या आरक्षणाला असलेला विरोध सेनेला सोडावा लागेल.'
5 . माकप : काॅ. अशोक ढवळे म्हणाले, 'भाजप सरकार येऊ नये अशी माकपची भूमिका आहे. मात्र माकप आंधळेपणाने काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या सरकारला पाठिंबा देणार नाही.'
घटक पक्षांचे ८ आमदार : महाआघाडीत १० पक्ष आहेत. त्यांचे एकूण ८ आमदार आहेत. काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. काही अपक्षांचाही आघाडीला पाठिंबा आहे.


०१ स्वाभिमानी
०१ शेकाप
०१ माकप
०३ बहुजन विकास आघाडी
०२ सपा
 

बातम्या आणखी आहेत...