आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खानचे वडिल सलीम खान शनिवारी म्हणाले की, अयोध्येमध्ये मुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या पाच एकर जागेवर शाळा बनवली गेली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सलीम खान म्हणाले, 'भारतातील मुस्लिमांना मशिदीची नाही तर शाळेची गरज आहे. या निर्णयाचे स्वागत करत सलमानचे वडिल सलीम खान म्हणाले, पैगंबर यांनी इस्लामला दिन विशेष गोष्टी दिल्या आहेत, ज्यामध्ये प्रेम आणि क्षमा सामील आहे. आता जेव्हा या कथेचा (अयोध्या वाद) द एन्ड झाला आहे तर मुस्लिमांनी या दोन गोष्टी घेऊन पुढे चालले पाहिजे. 'प्रेम व्यक्त करा आणि माफ करा.' आता हा मुद्दा पुन्हा उकरून काढू नका... येथून पुढे चला.'
पुढे सलीम खान यांनी आयएएनएसला सांगितले, "निर्णय आल्यानंतर ज्याप्रकारे शांती आणि सौहार्द्र कायम राहिले आहे ते कौतुकास्पद आहे. आता हे स्वीकार करा.. एक जुना वाद संपला आहे. मी मनापासून या निर्णयाचे स्वागत करतो. मुस्लिमांनी आता या विषयावर चर्चा केली नाही पाहिजे. त्याजागी त्यांनी सध्याच्या समस्यांवर चर्चा केली पाहिजे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी अशी चर्चा यासाठी करत आहे कारण आपल्याला शाळा आणि रुग्णालयांची गरज आहे. आयोध्येमध्ये मशिदीसाठी मिळणाऱ्या पाच एकर जागेवर कॉलेज बनले तर उत्तम होईल."
सलीम खान म्हणाले, "आम्हाला मशिदीची गरज नाही. नमाज तर आम्ही कुठेही वाचू शकतो.. ट्रेनमध्ये, प्लेनमध्ये जमीनीवर कुठेही वाचू. पण आम्हाला उत्तम शाळांची गरज आहे. 22 कोटी मुस्लिमांना चांगले शिक्षण मिळाले तर या देशातील अनेक कमतरता पूर्ण होऊ शकतात." पंतप्रधानांबद्दल बोलताना ते म्हणाले, "मी पंतप्रधानांशी सहमत आहे, आज आम्हाला शांततेची गरज आहे. आपल्याला आपल्या उद्देशावर फोकस करण्यासाठी शांतता हवी. आपण आपल्या भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला माहित असायला हवे की, शिक्षित समाजातच उत्तम भविष्य आहे. मुख्य मुद्दा हा आहे की, मुस्लिम शिक्षणात मागे आहेत. त्यामुळे मी पुन्हा हे म्हणतो की, चला आपण अयोध्या वादाला द एन्ड म्हणू आणि एक नवी सुरुवात करू."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.