आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हसनाबाद- मुलीचे बाळंतपण माहेरी व्हावे, यासाठी माहेरी आणलेल्या विवाहितेच्या अडीच महिन्याच्या बाळाला पेन्टा लस देण्यासाठी आईसह आजी हसनाबादच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यात आली. परंतु, यानंतर अर्ध्या तासातच सचिन मनोज सोनवणे (सावखेडा, ता. भोकरदन) या अडीच महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला.
नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर त्या बाळावर औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात एक जिल्हा शल्य चिकित्सक, दोन वैद्यकीय अधिकारी, एक न्यायवैद्यक अधिकारी अशा चार तज्ज्ञ समितीच्या उपस्थितीत पोस्टमार्टम झाले. औरंगाबादहून दोन दिवसानंतर हा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
हसनाबादच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. बाळाला लस दिल्यानंतर गावाकडे त्या परत जाऊ लागल्या. परंतु, रस्त्यात बाळाने मान टाकल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात नेले. परंतु, यानंतर अर्ध्या तासाने बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान, आक्रमक झालेल्या नातेवाइकांनी यानंतर या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. घडलेल्या या प्रकारामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक हातगावकर यांनी भेट देऊन पाहणी करत आढावा घेतला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.